धार्मिकसातारा

रामवाडी येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-


सात दिवस भजन, कीर्तन, प्रवचन,ज्ञानेश्वरी पारायण असे भरगच्च कार्यक्रम;

पाचगणी. दि.१२.    रामवाडी ता.जावली येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे ७४ वे वर्ष असून सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री. ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायाणस आज गुरुवार ११ एप्रिल रोजी प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक ग्रामस्थ रामवाडी यांनी माहीत दिली.

अखंड हरीनाम सप्ताहामध्ये श्रीराम मंदिरात विनेकरी आणि सामुदायिक पारायण सोहळा वाचन करताना भाविक..

प्रारंभी सकाळी विधिवत धार्मिक विधी करून विनेकराच्या हाती वीणा देत प्रभू रामचंद्राच्या जयघोषात अखंड हरिनाम सप्ताहचा प्रारंभ झाला. असून संध्याकाळी ह.भ.प. संतोष महाराज भांदिर्गे ( पानस ) यांच्या कीर्तनाने सुरवात होईल तर हरिनाम सप्ताहात ह.भ.प. अक्षय महाराज गुजर, ह.भ.प. सिध्दनाथ महाराज शामगांवकर ( शामगांव ), ह.भ.प.अविनाश महाराज महाडीक ( घोटेघर ), ह.भ.प. तुकाराम महाराज काळोशिकर ( सातारा ), ह.भ.प. अलकाताई वाल्हेकर ( नसरापूर ), बुधवार दिनांक १७ एप्रिल या रामनवमी मुख्य दिवशी जन्मउत्त्सोव सोहळ्याचे किर्तन कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज पाडळे ( रामवाडी ) यांचे सकाळी १० ते १२ दरम्यान होईल. त्यानंतर जन्मउत्त्सोव सोहळा संपन्न होईल..दुपारी ३ से ५ वा. श्रींची मिरवणूक दिंडी सोहळा होईल.

नित्यनियमाने दैनदिन कार्यक्रमांतर्गत पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ वा. ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन, सायंकाळी, ६ ते ७ वा. हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरीकिर्तन, नंतर हरिजागर होईल.

संध्याकाळी रात्री ९ ते ११.म.प. कृष्णा महाराज करडे ( बागोली ) यांचे किर्तन. होईल.दुसरा दिवस काल्याचा असतो दिनांक १८ एप्रिल रोजी काल्यानिमित्त सकाळी १० ते १२ ह.भ.प.प्रविण महाराज शेलार ( पीलिया ) यांचे किर्तन होईल.संध्याकाळी भारुडकार ह. भ. प. जगन्नाथ महाराज खरात. अकलूज यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल. आणि आठ दिवस चालू असलेल्या कार्यक्रमाची अखेर सांगता होईल.सदर कार्यक्रमाचे नियोजन माहिती ग्रामस्थ मंडळ रामवाडी यांनी केलं आहे.

या आठ दिवसांमध्ये चालू कार्यक्रमात सेवारुपी काम करण्याकरिता आठ दिवस आठ सेवापथके ग्रामस्थांमधून तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक दिवशी एक सेवा पथक सेवारुपी काम करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हा सेवाग्रूप २० सेवेकरींचा आहे..

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!