
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ———
मेढा.दि.१०. दरवर्षी शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये पीक कर्ज वाटप केले जाते.यावर्षी विकास सेवा सोसायटी मार्फत केळघर विभागातील एकूण १०६८ शेतकरी सभासदांना ०५ कोटी ३६लाख रुपये पीक कर्ज वाटप मंजूर झाले आहे.नव्याने पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
केळघर विकास सोसायटी मार्फत गत वर्षी कर्ज वाटप करण्यात आले होते त्यापैकी यावर्षी ८९% उच्चांकी कर्ज वसुली करण्यात आली आहे. शेतकरी सभासदांना चालू वर्षात जिल्हा बँकेचे मार्फत मंजुर करण्यात आलेल्या रकमेपैकी सोसायटीचे चेअरमन सुनिल जांभळे यांच्या हस्ते ७६ लाख ८३ हजार रुपयांचा या हंगामाचा पीक कर्जाचा पहिला चेक वाटप करण्यात आला.
जावली तालुका हा खरीप पिके उत्पादन करणारा प्रमुख तालुका असून भात पिकाचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नविन सभासदांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावी.तसेच पीक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे शेती सामग्री खरेदीसाठी पीक कर्ज दिले जाते.प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर थेट कर्ज मंजूर रकमा जमा करणार असल्याचेहि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक सुर्यकांत चिकणे,व्हाईस चेअरमन तुकाराम पार्टे,संचालक हरिभाऊ शेलार,संचालक रामभाऊ शेलार,संचालक दिलीप पाटील,संचालक श्रीरंग शेलार,संचालक लक्ष्मण जाधव,सचिव आनंदा शेलार,जगन्नाथ शिर्के,भैरू ओंबळे,प्रदीप कासुर्डे,अक्षय पवार,नंदकुमार पाटील उपस्थित होते.सोसायटीच्या ज्या सभासदांनी अद्याप पीक कर्ज घेतले नाही, त्या सभासदांनी विकास सेवा सोसायटीशी संपर्क करून पीक कर्ज प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा व्यवस्थापक सुर्यकांत चिकणे यांनी केले आहे.