आ.शिवेंद्रसिंहराजे भोसलेसातारा

छ.शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या मेढा येथील वसंतगडावर होणार मेळावा

स्टार ११ महाराष्ट्र

नुतन खासदारांचा होणार सन्मान, वारकरी सांप्रदायासह सुहास गिरी व जयश्री गिरींची ही उपस्थिती

        

मेढा / प्रतिनिधी –

सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली तालुक्यात केलेल्या कोट्यावधी विकास कामांचा डोंगर रचला असून जावली तालुक्याच्यावतीने महामेळावा घेवून बाबाराजे यांचे स्वागत व पाठींबा देण्यासाठी तसेच नुतन खा. श्री. छ. उदयनराजे भासले व खा. नितीनकाका पाटील यांचा नागरी सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी जिप उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिली. या मेळाव्याला जावी तालुक्याचे माजी सभापती सुहासदादा गिरी व जयश्रीताई गिरी यांच्यासह वारकरी संप्रदायाची उपस्थिती महत्त्वाची असणार आहे.


              वसंतगड मान कुमरे पॉइंटवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता आण्णा पवार मेढेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना मानकुमरे म्हणाले दि. ७ रोजी सायंकाळी ६ वाजता या मेळाव्याचे आयोजन वसंतगडावर करण्यात आले आहे. या महामेळाव्यामध्ये  तालुक्यातील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) , राष्ट्रवादी ( अजित पवार गट ), आठवले गट आदी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


             या मेळाव्यामध्ये लोकसभेच्या निवडणूकीमध्ये निवडून आलेले खा. श्री छ. उदयनराजे भोसले आणि खा. नितीनकाका पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून  शिवाजीराव देशमुख तसेच सांप्रदायिक क्षेत्रात काम करणारे व जावली तालुक्याचे माजी सभापती
सुहासदादा गिरी व जयश्री ताई गिरी यांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे या मेळाव्यात सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील वारकरी संप्रदाय कीर्तनकार प्रवचनकार आधी उस्फूर्तपणे उपस्थित राहणार आहेत.


                लोकसभेला शशिकांत शिंदे बरोबर असणारे सुहास गिरीं बाबत बोलताना वसंतराव मानकुमरे म्हणाले  छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना दोन वेळा संधी देवुन पती पत्नीला सभापती बनविले होते. ते कायम बाबांच्या बरोबरच होते व आहेत. लोकसभेला शशिकांत शिंदे व त्यांचे कौंटुंबिक व व्यावसायिक संबंध असल्याने त्यांना त्यावेळी सहकार्य करण्याची परवानगी दिली होती आता ते विधानसभेला शिवेंद्रराजेंच्या सोबत व भक्कमपणे असणार आहेत.


             सातारा जावली विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार  छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना महाराष्ट्रात एक नंबरचे विजयी उमेदवार करण्यासाठी खा. उदयनराजे भोसले प्रयत्नशिल असल्याचे वसंतराव मानकुमरे यांनी सांगुन जावली तालुक्यातील सर्व माताभगिनींनी व मतदारांनी महामेळाव्यास बहुसंख्येने वसंतगडावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!