सातारासामाजिक

“सहकार से समृध्दी” कार्यक्रम संपन्न

सातारा जिल्ह्यातील 593 विकास संस्थांना केंद्राची मंजूरी

स्टार ११ महाराष्ट्र

सातारा दि.२७. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “सहकार से समृध्दी” या कार्यक्रमांतर्गंत देशात निर्माण झालेल्या 10 हजार विकास संस्था व 6 हजार दुग्ध संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दि.25 डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सातारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक सातारा येथे यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक संयजकुमार सुद्रीक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे यांनी केले. प्रमुख पाहूणे म्हणून सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक सुनिल खत्री, श्री सावंत सौ.अनुजा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा निबंधक श्री. सुद्रीक म्हणाले, “सहकार से समृध्दी” या केंद्रीय योजनेंतर्गत सातारा जिल्हात 976 विकास संस्थांपैकी 615 संस्थांनी कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी अर्ज केले होते. त्यातील 593 विकास संस्थांना केंद्र चालवणेसाठी मंजूरी मिळाली आहे. 408 संस्थांची केंद्रे सद्या चालू आहेत. तसेच 4 विकास संस्थांनी जनऔषधी केंद्रे जेनेरीक मेडीकल सुरू करणेसाठी अर्ज केले आहेत. रहिमतपूर विकास कोरेगाव, केळघर विकास केळघर, जावली, चरेगाव विकास-चरेगाव, कराड या संस्थांनी जनेरीक मेडीकल चालू केली आहेत. 5 विकास संस्थांनी ग्रेन स्टोरेज मध्ये गोदामाचे बांधकाम पुर्ण केले असून 50 विकास संस्थांनी पी.एम.किसान समृध्दी केंद्रामार्फत खते-बि-बियाणे, औषधे विक्री करणेसाठी दुकाने चालू केली आहेत. केंद्रीय बहुराज्यीय संस्था बीज संस्थेच्या जिल्हातील 856 संस्था सभासद तसेच केंद्रीय संस्थेचे 24 सभासद व निर्यात संस्थेचे 36 संस्था सभासद झाले असून या संस्थांना या संस्थेमार्फत व्यवसाय करणेसाठी संधी उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हात 5 विकास संस्था नाफेड व 13 विकास संस्था एनसीसीएफ या संस्थाकडे नोंदणी केल्या असून त्यांचेकडून आपले व्यावसाय वाढवणार आहेत. सद्या जिल्हात एकुण 4717 सहकारी संस्था नोंदणी केलेल्या असून यासर्व संस्था केंद्र शासनाचे एनसीडी पोर्टलवर नोंदणी केल्या आहेत.सातारा जिल्हात पहिल्या टप्यात 933 संस्थांना या कार्यक्रमातर्गत संगणक हार्डवेअर व सॉफटवेअर देणेत आले असून सर्व संस्थांचे दप्तर सॉफटवेअरवर भरणेचे काम शासनामार्फत चालू आहे.सदरील कामकाजात सातारा जिल्हाबँकेने संपुर्ण सहकार्य केले असून आपलेकडील मनुष्यबळ वापरून जिल्हातील 712 संस्था गो लाईव्ह झाल्या आहेत असेही उपजिल्हा निबंधक श्री. सुद्रीक यांनी कार्यक्रमा प्रसंगी सांगितले.
“सहकार से समृध्दी” या कार्यक्रमामध्ये विकास सहकारी संस्थांचे संगणकीकरणाचे काम राज्यात चांगले झाले आहे.712 संस्था गो लाईव्ह झाल्या आहेत या कामात सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे, सर व्यवस्थापक राजेंद्र भिलारे, व्यवस्थापक भानूदास भंडारे, जिल्हा बँकेचे सर्व डी.डी.ओ शाखाधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाययक निबंधक जे.पी.शिंदे, संजय जाधव, सहाय्यक निबंधक, दुग्ध श्री. शिवरकर, जिल्ह्यातील सर्व उप/सहाय्यक निबंधक, जिल्ह्यातील सर्व सचिव यांनी अतिशय चांगले काम केले असल्याचेही श्री. सुद्रिक यांनी सांगितले.
कार्यक्रमात सातारा जिल्ह्यात नवीन नोंदणी झालेल्या प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था तसेच मत्स्य संस्थांचे पदाधिकारी यांना संस्थांचे नोंदणीची प्रमाण पत्रे मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.या कार्यक्रमास सर्व विकास संस्थांचे पदाधिकारी, सचिव व सहकार विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!