राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते पुणेआणि पिंपरीचिंचवड शहरातील विविध लोकोपयोगी विकासप्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——–
पुणे. दि. ०२ . आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते आज पुणे आणि पिंपरीचिंचवड शहरातील विविध लोकोपयोगी विकासप्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी राज्यपाल रमेश बैस हेदेखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते पुणे मेट्रो च्या पुढच्या टप्प्याचा शुभारंभ तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या पुढील टप्प्याचे भूमिपूजन आणि लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचा टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून राज्य सरकारकडून पुण्यातील विविध विकासप्रकल्पांना चालना देण्याचे कार्य होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आल्यावर कायमच नवी ऊर्जा मिळते, काम करण्याचं बळ मिळते असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. पुणेकरांचा वाहतूक कोंडीचा त्रास दूर करण्यासाठी पुणे रिंगरोडला चालना देण्यात येत असल्याचे यावेळी नमूद केले.
देशाच्या विकासाचा रथ पुढे नेण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. जगभरात लोकप्रियतेत ते प्रथम क्रमांकावर आहेत. अयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न त्यांच्यामुळेच पूर्ण होत आहे. आज जगभरात देशाचे नाव सन्मानाने घेतले जात आहे. ५ ट्रीलिअन डॉलर अर्थव्यवस्थेचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात महाराष्ट्र एक ट्रीलिअन डॉलरचा वाटा उचलेल असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे शहरातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी तसेच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!