सामाजिक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार अंगीकृत करा : किरण बगाडे

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——युवराज धुमाळ 

मेढा. दि. ०२ 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या वतीने करहर ता.जावली या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एकजुटीतून करहर मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भव्य रॅलीचे आयोजन करून मोठ्या उत्सवात जयंती साजरी करण्यात आली.

जग बदल घालुनी घाव सांगून मज गेले भीमराव हा संदेश बहुजनांना देत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी अनेक साहित्य कादंबरी लिहिल्या त्यातून समाज प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले.

पीडित कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा उभारला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान च्या माध्यमातून भारतीय प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार दिले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येकाने स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे तसेच एकजुटीने राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या वेळी  जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी केले.

आज पर्यंत जावली तालुक्यामध्ये सार्वजनिक पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली नव्हती मात्र सर्व बांधवांच्या वतीने हे आयोजित करण्यात आली तसेच इथून पुढच्या कालावधीमध्ये सर्व बांधवांच्या विचारातून मेढा या ठिकाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची भव्य अशा पद्धतीची जयंती साजरी करणारअसा निर्धार सर्व बांधवांनी केला आहे.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले या कार्यक्रमासाठी सयाजी भिसे मोहिते (महू) अतुल भिसे दिगंबर कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमा वेळी रिपाई(A)चे जिल्हा सचिव किरण बगाडे जावली तालुकाध्यक्ष अमित साळुंखे उपाध्यक्ष सयाजी भिसे सचिव दिगंबर कांबळे टायगर ग्रुप चे अजय चव्हाण अतुल भिसे पाचवड सुनील भिसे बळवंत कांबळे राम गायकवाड (मामा) धर्मा भिसे पुजारी साहेब (सरताळे) शामराव भिसे भिसे साहेब (माजी पोलीस पाटील) वालुथ राजू भिसे अक्षय दुधाने सदाशिव भिसे अशोक भिसे राजू खुडे संगीता भिसे व इतर महिला व कार्यकर्ते उपस्थित होते

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!