पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांची भेट
मराठा आरक्षणाबाबत केली सविस्तर चर्चा
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——–
सातारा, दि ३, ( जि. मा. क.) – मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
यावेळी पालकमंत्री श्री देसाई व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये पालकमंत्री श्री देसाई यांनी न्यायालयामध्ये सुरू असलेली प्रक्रिया या विषयी माहिती दिली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजला देण्यात येणाऱ्या सवलतींविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
यावेळी मराठा समाजाने शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व आरक्षणाच्या बाबत शासनास सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्री श्री देसाई व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.