श्री महादेव मंदीर धारेश्वर महाराज मठ सातारा येथे त्रिदिवसीय श्रावणमास शिवपूजा जपानुष्ठान आरंभ.
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
सातारा .दि .०२. श्रावण महिना चातुर्मासात श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो.म्हणुनच या महिन्यात सण व्रत-वैकल्ये जास्त असतात. श्रावणी सोमवार,प्रदोष याच महिन्यात असतात या काळात जास्तीत जास्त व्रत वैकल्ये करुन मनुष्य प्राणी सदाचरणी होऊन देवाचे कृपा छत्र आपल्यावर रहावे म्हणून प्रयत्न करतो.
श्री षब्रप्र १०८पद्मभास्कर डॉ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या ४१ व्या श्रावण मासातील पुणे शिंगणापूर सातारा फुलकळस अंगापूर धारेश्वर अशा चरानुष्ठानितील सातारा येथे दरवर्षी होणाऱ्या तिसऱ्या सोमवारचे त्रिदिवशीय अनुष्ठान आज शनिवारी सकाळी श्री महादेवमंदीर धारेश्वरमहाराजमठ,१५३,रविवारपेठ,सातारा येथे त्रिदिवसीय श्रावणमास शिवपूजा जपानुष्ठान आरंभ करण्यात आला.यावेळी कळसकर दांपत्य, वीरशैव महिला मंडळाच्या मंत्रघोषात समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास कामळे यांच्या हस्ते पादुकापूजन करुन सुरु झाले.भाजपा ओबिसी महिलाध्यक्षा वनिता पवार यांच्या उपस्थितीत आरंभ झाला.ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी स्पीकरवर भक्तीगीत आरंभ केला.स्थानिक माता भगिनींनी तोरणबांधून चौकट पूजा केली.महेश स्वामी आसनीकर यांनी दूरस्थ पद्धतीने जंगमध्वनीवरुन संकल्प व पंचकलश गणेश पूजन केले.सौ.वैशाली राजमाने यांनी महाप्रसाद व फराळ वाटप केले.लहान मुलांनी नमश्शिवाय चा जप केला.सायं०५-३०ते०७-३० जपपूजा व नरजन्मरहस्य ग्रंथ पारायण झाले.
उद्या रविवार ३/९/२०२३ स७-९- जपपूजा नरजन्मरहस्य पारायण.स०९-१२सामूहिक लिंगपूजा अभिषेक बिल्वार्चन शिवदीक्षा पारायण,प्रवचन व फराळ वाटप.सायं०५-०७ जपपूजा पारायण व आरती होणार आहे.
सोमवार दि.०४/०९/२०२३सकाळी ०७-१० अभिषेकबिल्वार्चन दीक्षा.पारायण प्रवचन व फराळ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.सकाळी ११ नंतर श्रीषब्रप्र १०८ पद्मभास्कर डॉ. नीलकंठशिवाचार्य धारेश्वरमहाराज यांचे लातूर फुलकळस कडे प्रयाण होणार आहे.