स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
मेढा. दि .२२.जावली तालुक्यात विविध ठिकाणी, मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. मेढा येथील स्वामी समर्थ महाराजांच्या सजवलेल्या मंदिरात भर पावसात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुपौणिमेनिमित्त स्वामी मंदिर रंगीबेरंगी फुले आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते.सकाळी स्वामींच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला व होम हवनाचा कार्यक्रम पार पडला,भाविकांनी सकाळ पासूनच मंदिरामध्ये गर्दी केली होती तसेच दिवसभर भक्तांची वर्दळ सुरू होती. मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सुट्टीचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
सायंकाळी स्वामी मंदिर परिसरात पालखी सोहळ्यासह महाआरतीही घेण्यात आली तसेच आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसाद होता. महाप्रसादानंतर मंदिरामध्ये स्वामींच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते.