सामाजिक

एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात कराड येथे दाखल

- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ———
सातारा दि. 26 .                     भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण महाबळेश्वर वाई जावली व सातारा) या ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे . संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत एनडीआरएफचे एक पथक पूर्वस्थितीत (Pre positioning) सातारा जिल्ह्यात आज कराड या ठिकाणी दाखल झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
                                 या पथकाचे प्रमुख एन डी आर एफ बटालियन पुणेचे इन्स्पेक्टर राहुल कुमार रघुवंश हे आहेत. सदरच्या पथकात अधिकारी व जवान यांचा समावेश असून एकूण 25 जणांचे पथक तैनात असणार आहे. पथकाकडे आवश्यक ते सर्व साहित्य व यंत्रसामग्री उपलब्ध आहे. हे पथक जिल्हा प्रशासनाची समन्वयाने आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणार आहे.
                                                       सदरचे पथक कराड येथे दाखल होतात तहसीलदार विजय पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!