क्राईम

दुहेरी खूनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला मेढा पोलिसानी केली अटक

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी   ———-

मेढा .दि .२६ . मेढा पोलीस ठाणे,मिळालेल्या माहितीनुसार आज एकीव धबधब्याचेजवळ दरीमध्ये दोन इसमांना ढकलुन देवून केलेल्या दुहेरी खूनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला अटक करण्यात आली .एकीव ता.जावली येथील धबधब्याचे जवळ दिनांक १६/७/२०२३ रोजी दोन इसमांना लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांना धबधब्याचे शेजारी दरीत ढकलुन देवून त्यांचा खून केला असल्याचे दिले तक्रारीवरून मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ११४/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करणेत आलेला होता .

दुहेरी खुनाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संतोष तासगांवकर यापुर्वीच सदर गुन्ह्यातील ०३ आरोपींना अटक करून पुढे तपास सुरू होता परंतु सदर गुन्ह्यातील त्यांचा चौथा साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार होता.त्यामुळे त्याचा शोध घेणेबाबत वरीष्ठांनी आदेशीत केलेले होते,त्यानुसार सदर आरोपीचा पोलीस ठाणेचे खास पथक तयार करून गुप्त बातमीदारांचे मार्फतीने शोध घेत असताना काल दि.२५/७/२०२३ रोजी तो आरोपी मिळुन आल्याने त्यास सदर गुन्ह्याचे तपासात अटक करणेत आलेलीआहे.

सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री.समीर शेखअप्पर पोलीस अधीक्षक श्री.बापू बांगर
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बाळासाहेब भालचिम,यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक,श्री.संतोष तासगांवकर,स.पो.फौ.गंगावणे,पोशि/सनी काळे,दिगंबर माने, सागर मोरे,सुरज वाघमळे,यांनी सहभाग घेतला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि श्री.संतोष तासगांवकर अधिक तपास करीत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!