स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——–
वाई. दि ३१. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून आज (दि ३१) सायंकाळ पासून धोम धरणातून सांडव्या वरून पाच हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.
धोम धरणाची पाणी पातळी ७४३.८५ मी झाली झाली असून धरणा मध्ये एकूण पाणी साठा २९८.६६५ दलधमी असूनहि (७८.१२) धरणा मध्ये पाण्याची आवक ४४०० क्युसेक असून निर्धारित नुसार पाणी पातळी राखणे करिता धोम धरणांचे सांडवा व्दार क्र १,५ व २ आणि ४ हे ०.५०मी ने उघडून ख नदी मध्ये एकूण ३४०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
धोम बलकवडी धारणात १८०० क्युसेक पाणी आवक असून कृष्णा नदीतून धोम धरणात १८०० क्युसेक पाणी सोडण्यातख येत आहे.
तसेच पावसाचे प्रमाण व आवक नुसार सांडव्याचे विसर्ग पुर्व सुचना देऊन कमी जास्त करण्यात येईल. धरणा खालील सर्व गावातील प्रशासन व ग्रामस्थ यांनी सर्तक राहून नदी पात्रात प्रवेश करून नये.तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व वाई पालिका हद्दीत नदी पात्रातील काम त्वरित बंद करून नदी पात्रात कोणी काम करणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे