राजकीय

शहीद स्मारकातील पवित्र एक मूठ माती अमृतकुंभामध्ये

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–

केळघर. दि.०९. आज “मेरी मिट्टी मेरा देश” उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून सावली ता.जावळी येथील शहीद पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांच्या पुतळ्याला भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि या शहीद स्मारकातील पवित्र एक मूठ माती अमृतकुंभामध्ये घेतली तसेच क्रांती विद्यालय सावलीच्या विद्यार्थ्यांना क्रांतीदिनाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.


यावेळी संदीप आप्पा मस्कर, प्रशांत झुंजरे शाळा समिती अध्यक्ष, श्रीहरी गोळे तालुकाध्यक्ष जावळी, प्रमोद शिंदे बाजार समिती संचालक, विकास देशपांडे माजी नगरसेवक, किरण भिलारे सरचिटणीस, विजय सपकाळ सरपंच, विठ्ठल देशपांडे, विठ्ठल बोलशेटवार, विकास गोसावी, विकास जाधव, धनंजय जांभळे मा.नगरसेवक, प्रवीण शहाणे सरचिटणीस सातारा शहर, अविनाश खर्शीकर, विधानसभा विस्तारक एस.आर. पवार मुख्याध्यापक हायस्कूल क्रांति विद्यालय, रघुनाथ दळवी मुख्याध्यापक जि.प.शाळा आदि मान्यवर आणि क्रांती विद्यालय व जिल्हा परिषद शाळा सावलीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!