सातारासामाजिक

नवरात्रीचे औचित्य साधून माऊलींचा सन्मान व चरण पूजन सोहळा संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- संजय वांगडे

अनोख्या सोहळ्याने क्षेत्र कुसुंबी मधिल वातावरण भक्तिमय

कुसुंबी. दि.२५.जावली तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र कुसुंबी काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून कुसूंबी करांनी साजरा केला आगळा वेगळा‌ उपक्रम उतराई मातृ ऋनाची हा उद्देश समोर ठेवून समस्त कुसुंबी करांनी आपल्या आईचे पाय पूजन करून मातृऋणाचा सन्मान केला.

खरंतर मात्र ऋण काही केल्याने फिटत नाही परंतु आपल्या आई ने आपल्यासाठी केलेले अपार कष्ट डोळ्यासमोर ठेवून तिचे पाय पूजन करून थोडीशी का होईना पण उतराई मिळेल असा उद्देश समोर ठेवून समस्त कुसुंबीकरांनी आपल्या मातेचे पाय पूजन केले. हा कार्यक्रम चालू असताना कुसुंबीकरांचे आपल्या आईवर असलेले प्रेम त्यांच्या डोळ्यातून दिसून आले. भाग्य लाभले आम्हाला जो हा क्षण आमच्या नशिबी आला अशी सदभावना व्यक्त करत आई काळेश्वरी च्या साक्षीने मातृ पूजेचा मान मिळाला धन्य झालो आम्ही,जावली तालुक्यातील तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र ‌कुसूंबी येथे ग्रामदेवता माता काळेश्वरी मंदीरात नवरात्र उत्सवाची लगबग सुरू आहे. या नऊ दिवसात वेगवेगळी रुप आपणास पाहायला मिळतात.

आपल्या कुटुंबाला सांभाळणारी “गृहलक्ष्मी”भोजन बनवणारी “अन्न पूर्णा” जरी तिनं शिक्षण घेतलं नसलं तरी पुस्तक घे बोलणारी “सरस्वती” संकटांशी सामना करणारी “दुर्गा” आणि “कालिका, चंडिका” होऊन घराचं रक्षण करणारी ती माऊली म्हणजे आपली “आई”रविवार दिनांक २२-१०-२०२३ रोजी रात्री ८-०० वाजता काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व पदाधिकारी, नाचणीचे गाव श्रीक्षेत्र कुसूंबीचे सरपंच, उपसरपंच, नेहरू युवा मंडळ कुसूंबीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्या, नवदुर्गां यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर श्रीफळ वाढवून,अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत राजा शिवछत्रपती, विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून, बालवीर भजन मंडळ कुसूंबी यांची “आई” हे गीतं गाऊन कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी.
धुणी – भांडी, भिंती सावरणे, स्वयंपाक करणे, जात्यावर दळण भरडणे, झऱ्यावरुन पाणी आणने, शेतात राबणे , जुन्या रुढी परंपरा चालीरीती जपून भारतीय संस्कृती अबाधित ठेवून आपलं सुख जपणारी माऊली म्हणजे आपली “आई”..अनेक संत महात्मे… सद्गुरू यांनी चरण अमृत….चरण पूजन याचे महत्त्व पटवून सांगितले आहे अनेक तिर्थांचे पुण्य पदरी पडणाऱ्या…. जीवनातील अनेक रोग नाहीसे करणारी प्रचंड ताकद असणारा हा सोहळा कुसूंबीची ग्रामदेवता माता काळेश्वरीच्या साक्षीने तिच्या आवारात नाचणीचे गाव श्रीक्षेत्र कुसूंबीकरांनी आपल्या ६० वर्षांवरील माऊलींचा चरण पूजन आणि पुष्प, मायेची ऊब देणारी शाल देऊन तिच्या ऋणातून उतराई होण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम नेहमीच सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुसूंबी यांच्या वतीने श्री क्षेत्र कुसूंबीकरांनी साजरा केला.

यावेळी सरपंच,उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील सर्व कुसूंबीकर, मुंबईकर, जेष्ठ नागरिक, युवक, युवती, महिला बालचमू, अंगणवाडी सेविका,आशा सेविका,नेहरू युवा मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ,शिवतेज ग्रुप कुसूंबी,साई आदर्श मंडळ,बाबाचौक मित्र मंडळ, ज्योतिर्लिंग मित्र मंडळ,श्री दत्त सेवा मंडळ बामणवाडी,श्री गणेश मित्र मंडळ जांभूळवाडी, जय हनुमान मंडळ ‌बालदारवाडी,या कार्यक्रमास उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!