क्राईमसातारा

अवैध गुटखा विक्रेत्यावर मेढा पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक,५ लाखांचा ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-

 

खबरदार,जावली तालुक्यात गुटखा विकाताय, लवकरच आपणावर सुध्दा होणार मेढा पोलिसांची होणार धडक कारवाई

मेढा.दि.२५. राज्यात बंदी असलेला गुटखा आज जावली तालुक्यात मेढा पोलिसांनी सापळा रचून हुमगाव गावच्या हद्दीत गाडीचा पाठलाग करून गुटख्याची अवैद्य चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणारे इसमावर कारवाई करून बेकायदेशीर गुटख्याचा मुद्देमाल व वाहन जप्त केले.

 

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक इसम पाचवड बाजुकडून पाचगणी बाजुकडे एक पांढरे रंगाची ऑक्टावीआ स्कोडा कार नं. एम.एच.१४.सी.सी. ६१६१ घेऊन जात असताना त्याला सदरची कार पोलिसांनी थांबविणेबाबत इशारा केला असता ती कार न थांबविल्याने तिचा पाठलाग करून त्यास मौजे हुमगाव ता. जावली जि.सातारा गावचे हद्दीत न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज हुमगावचे समोर रोडवर पोलिसांनी पकडले. कारमधील इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव आकाश प्रकाश मोरे, वय ३२ वर्षे रा. विराटनगर, अमृतवाडी, ता. वाई, जि. सातारा असे सांगीतले.व्यक्तीस ताब्यात घेवून सदर वाहनाची तपासणी केली असता पोलिसांनी एकूण त्यामध्ये ५६,०००/- रूपयांचा अवैद्य गुटखा आढळुन आल्याने सदरचा अवैद्य प्रतिबंधीत गुटखा व वाहन असा एकुण ५,७६,०००/- रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेवुन जप्त केला असून आरोपीविरूद्ध अन्न व सुरक्षा अधिकारी यांचे फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आला.


नेमका हा गुटखा कोणाचा? गुटखा कोठून आणला होता आणि कोठे घेऊन जाणार होता? तालुक्यात गुटख्याची विक्री कोठे केली जाते याबाबत मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.डी.जी.शिंदे, पो.ना.शेख,पो.कॉ / सनी काळे, निलेश देशमुख, श्री.योगेश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!