
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- सुरेश पार्टे
मेढा.दि.१३.
ऐन दिवाळी सणात शनिवार दि..११ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मेढा मोहाट पुलावरून एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली असून आज सोमवार तीसरा दिवस गेला तरी मृत देह सापडला नाही.या घटनेबाबत मासेमारी करणाऱ्या युवकांनी मेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली .
याबाबत मेढा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मेढा पुलावरून शनिवार दि. ११ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास एका वृद्ध व्यक्तीने पुलावरून नदीच्या जलाशयात उडी मारून आत्महत्या केली असून पुलाखाली मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली .माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी जावून पाहाणी केली . वृद्धाने आत्महत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्याच्या तळाशी गेल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली असून मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी महाबळेश्वर टेकर्स ला प्राचारण केले आहे . ग्रामस्थ ,व ट्रेकर्स यांच्या मदतीने वे०णा नदीपात्र कण्हेर जलाशयात शोध मोहिम सुरु असून अद्याप मृतदेह सापडला नाही. शोध मोहिमेसाठी पोलीस यंत्रणा मदत करत असली तरी दिवाळी मुळे शोध मोहिमेसाठी मदत तोकडी पडत आहे.
दरम्यान ऐन दिवाळीच्या सणात एका वृद्धाने आत्महत्या केल्याने जावली तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. तर आत्महत्या केलेल्या वृध्द व्यक्तीची अद्याप गांव नांव कळाले नाही.दरम्यान हुमगांव येथील वृध्द व्यक्ती बेपत्ता असून मृतदेह सापडल्याशिवाय व ओळख पटल्याशिवाय सत्यता समोर येणार नाही.