सातारासामाजिक

कुडाळ जिल्हा परिषद शाळेच्या पाडलेल्या जुन्या इमारतीचे बांधकाम साहित्य चोरीला

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- प्रतिनिधी कुडाळ

कुडाळ ग्रामस्थांनी या साहित्य चोरी बाबत सखोल चौकशीची केली मागणी

कुडाळ दि .०८.जावली येथील जिल्हा परिषद शाळेच्या नुतन इमारतीचे बांधकाम मंजुरी नुकतीच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली असुन यासाठी १ कोटी ५० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे,सदरचे बांधकाम करण्यासाठी जुनी इमारत निर्लेखीत करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायत शालेय समितीने दिला होता. व त्या जागेवर नुतन इमारत बांधणेची असताना,जुनी इमारत निर्लेखन चालु असून याबाबत कोणतेही शासकीय आदेश नसताना सदरचे निर्लेखन बेकायदा पद्धतीने चालू असल्याचा व या इमारतीचे बांधकाम साहित्य चोरीला गेले असल्याचे कुडाळ ग्रामस्थांनी पोलीस विभागाला याबाबत तक्रार द्वारे कळविले असून संबंधित विभागाने याचा योग्य तपास करून कारवाई करण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कुडाळ ग्रामस्थांनी केली आहे.


कुडाळ ग्रामस्थांनी पत्रकाद्वारे केलेल्या आरोपामध्ये सदर इमारत पाडुन त्यात असलेले पत्रे, स्टील लोखंडी साहित्य इत्यादीची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. याची माहिती मिळताच सर्व ग्रामस्थ शालेय समिती समोर गेले असता त्यांनी या समितीने देखील काही माहित नसल्याचे सांगून या कामाची जबाबदारी झटकली व आम्हाला काही माहिती नाही असे सांगण्यात आले. यावेळी उपसरपंच सोमनाथ कदम, माजी सरपंच विरेंद्र शिंदे जावली बाजार समिती उपसभापती हेमंत शिंदे यांनी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता जावली माधव पाटील यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा या कामात जबाबदारी झटकली असून निर्लेखन करताना मिळून आलेले साहित्य हे त्याच ठिकाणी ठेवून त्याचा ग्रामपंचायत व शाळा यांचे द्वारे लिलाव करून मिळणारी रक्कम ही शालेय विकास कामासाठी वापरावी लागते असे सांगितले मात्र संबंधित ठेकेदार याच्या बाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.


कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी स्टील साहित्य घेऊन जाणारा ठेकेदाराचा ट्रॅक्टर पकडून ग्रामस्थांच्या साथीने पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिला असून कुडाळ ग्रामस्थांनी या चोरी बाबत कारवाई करावी व ठेकेदार तसेच या मागे असणारा सूत्रधार याचा शोध घेऊन त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून,मात्र यावेळी पकडलेला माल पाच टन पेक्षा जास्त असून देखील पोलीस प्रशासन व बांधकाम विभाग यांनी कोणतीही कारवाई अजून पर्यंत केली नसून त्यांच्या या कार्य पद्धतीवर कुडाळ ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला असून यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता यावेळी ग्रामस्थांनी वर्तवली आहे. या इमारतीचे निर्लखन पाहणी करतेवेळी दहा ते बारा टक्के जुने स्टील आढळून आले आहे असे ग्रामस्थांचे मत आहे. ग्रामस्थांकडून या नूतन इमारतीला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट पणे सांगण्यात आले आहे.

या इमारत निर्लेखन पाहणी वेळी उपसरपंच सोमनाथ कदम, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे,उपसभापती हेमंत शिंदे जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, संजय शिंदे, महेंद्र शिंदे आशिष रासकर, संजय शेवते,गौरव शिंदे, चंद्रकांत गवळी संचालक जावली बँक ,नितीन शिंदे,महेश कदम, प्रशांत नायकुडे, कुडाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बांधकाम विभागाच्या वतीने ग्रामपंचायत कुडाळ, जिल्हा परिषद शाळा कुडाळ तसेच शाळा व्यवस्थापन कमिटी यांना या बाबत कोणताही पत्रव्यवहार न करता इमारत निर्लेखन करण्यात आले यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया शंकास्पद असून दोषींवर योग्य कारवाई झाली पाहिजे.


विरेंद्र शिंदे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुडाळ

बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी निर्लेखन बाबत हात झटकले असून गेल्या चार दिवसांच्या पासून काम सुरु असून यामध्ये अंदाजे दहा टन स्टील साहित्य चोरीला गेले असून ठेकेदाराने देखील या ठिकाणाहून साहित्य नेल्याचे कबूल केले आहे.

सोमनाथ कदम, उपसरपंच कुडाळ ग्रामपंचायत

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!