सातारासामाजिक

आखेगणीची मेघा गावडे दिल्लीतील प्राइड ऑफ इंडियाची मिस इंडिया २०२४ ची विजेती ; जावली तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला सौंदर्यवती

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——


पांचगणी.दि .२८. जावली तालुक्यातील आखेगणी या डोंगरमाथ्यावरील छोटेखानी गावातील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला शेतकरी सौ. मेघा सचिन गावडे यांनी दिल्ली येथे झालेल्या प्राइड ऑफ इंडियाची मिस इंडिया २०२४ ची विजेती ठरली आहे. याबद्दल मेघा गावडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

दिल्लीत नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत पाचगणीच्या या सौंदर्यवतीने आपली छाप पाडून विजेतेपद पटकावले आहे यामुळे पांचगणी बरोबरच जावली तालुक्याच्या मुकुटात आणखी ऐक मानाचा तुरा खोवला आहे. यावेळी पुष्पांजली तिवारी तसेच जिमी गरिमा यांची यावेळी उपस्थिती होती.

रिया डान्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांचे वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये पांचगणी येथे आयोजित केलेल्या “मिस अँड मिस्टर पाचगणी ” या सौंदर्य प्रदर्शन कार्यक्रमात ही सौ. मेघा सचिन गावडे या पहिल्या पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या होत्या.
मुळातच सौ. मेघा गावडे या शेतकरी कुटुंबातील गृहिणी आहेत. त्या सांसारिक जबाबदारी सांभाळत स्ट्राॅबेरीची उत्तम शेती करणाऱ्या उत्कृष्ट महिला शेतकरी आहेत. त्यांनी सौंदर्यवती स्पर्धांमध्ये केवळ पुणे , मुंबई सारख्या पंचतारांकित शहरांतील उच्चभ्रू कुटुंबातील महिलांचीच मक्तेदारी असते हा समज खोडून काढत ग्रामीण भागातील शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या महिला सुद्धा आपल्या मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर सौंदर्य स्पर्धांमध्ये नशीब आजमावत प्रथम पारितोषिकाच्या मानकरी ठरू शकतात हा आदर्श आखेगणी तसेच पंचक्रोशीतील महिला वर्गासमोर निर्माण केला आहे.


त्यांनी प्रापंचिक जबाबदारी सांभाळत घरात कुठल्याही कलेचा वारसा नसतानाही ग्रामीण भागातील एका महिलेने दिल्लीतही जागतिक दर्जाच्या सौंदर्यवती मध्येही आपली वेगळी छाप पाडून प्रेरणादायी असे यश मिळवत विजेतेपद पटकावले आहे. या पुरस्काराबद्दल सौ मेघा सचिन गावडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!