जावलीशैक्षणिक

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या वतीने सर्टिफिकेट कोर्स संपन्न

स्टार११ महाराष्ट्र न्युज —–

मेढा.दि.२८.
येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व बजाज फिनसर्व्ह यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाणिज्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या,“सर्टिफिकेट प्रोग्राम इन बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स” हा १०० तासांचा प्रॅक्टिकल कोर्स नुकताच संपन्न झाला.


महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या सी.एस.आर. निधीतून हाकोर्स घेण्यात आला.या कोर्ससाठी महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागातील ३८ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सदर कोर्ससाठी बजाज फिनसर्व्ह तर्फे तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांनी मेढा येथे येवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यामध्ये विमा, बँकिंग आणि फायनान्स सोबतच व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंत्रे याबाबत देखील सखोल मार्गदर्शन करण्यात आले.शंभर दिवसाच्या कोर्स नंतर विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा व मॉक इंटरव्ह्यू घेण्यात आले. यात यशस्वी झालेल्या ३४ विद्यार्थ्यांना सोमवार २४/०६/२०२४ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देवून गौरवण्यात आले. या कोर्सचे समन्वयक म्हणून प्रा.अमेय देसाई व प्रा. संग्रामसिंग नलवडे यांनी काम पाहिले. सदर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बजाज फिनसर्व्हद्वारे प्लेसमेंट सहाय्य उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची ग्वाही कंपनीचे समन्वयक अमित यालगी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!