
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
सह्याद्री माध्यमिक विद्यालय दिवदेव च्या
वाचनमहोत्सवाची सांगता
मेढा.दि.०६. दिवदेवता . जावली येथे पाच सप्टेंबर २०२४ रोजी विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांच्या वाचनाबरोबर अवांतर विषयाची चरित्र पुस्तके वाचण्याच्या छंदाकडे आदर्श विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व रुजवण्यासाठी वाचन महोत्सव हा उपयुक्त करण्यासाठी वाचन आणि अभिव्यक्ती वाचन आणि विचार कौशल्य वाचन आणि तर्क हा विद्यार्थ्यांना वाचनातूनच शिकवणे शक्य आहे त्यासाठी वाचन महोत्सवाची नितांत गरज आहे असे उदगार भाषा अभ्यासक शिवाजी राऊतयांनी काढले.
जावली तालुका येथील सह्याद्री माध्यमिक विद्यालय दि व देव विद्यालयात वाचन महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालाप्रमुख सुनील धनवडे हे होते वाचन ही अक्षर मैत्री आहे वाचन हा छंद आहे वाचन हा शब्द संग्रह आहे वाचन हा शब्दांचा वर्गीकरणाचा प्रयत्न आहे विशिष्ट वयातच वाचनाची गोडी निर्माण करण्यात शिक्षकांना यश आले तरच विद्यार्थी हे मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने उपासक बनू शकतात वाचक बनू शकतात लेखक बनू शकतात यासाठी सुज न शक्तीचा विकास म्हणजे वाचन शक्तीचा विकास होय असे सांगून राऊत पुढे म्हणाले की अक्षरेही माणसाची निरंतर सोबत करतात विचार विकासासाठी अक्षरांशिवाय दुसरा पर्याय नाही अक्षरांमुळे सभ्यता संस्कृती आणि उदारता निर्माण होते धर्माच्या आणि श्रद्धेच्या जोखंडातून मुलांना मुक्त करण्यासाठी ज्ञानावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांना वाचन वेडे बनवावे लागेल वाचन वेड ज्ञानाकडे जाण्याची वाट आहे आपला विचार विकास हा आपणासच करावयाचा असतो आजच्या शिक्षणात विचार करण्यासाठी शिकवले जात नाही स्मरण शिकवले जाते पाठांतर शिकवले जाते लेखन कौशल्यासाठी प्रयत्न केला जातो परंतु विचार पद्धती विचार कौशल्य विचारसरणी याबाबत शाळांच्या मधून सजग प्रयत्न होण्याची गरज आहे भाषा हा आनंद आहे भाषा हा खेळ आहे भाषा हा अभिमान आहे अभिव्यक्ती हे समाधान आहे यासाठी भाषा भक्ति सततच्या वाचनातून करता आली पाहिजे मराठी शाळांच्या मधून अभ्यासक्रम व क्रमिक पुस्तके यापलीकडे ग्रंथालय इथे अक्षर यज्ञ सतत प्रज्वलित राहिला पाहिजे बंद ग्रंथालय ही बंद समाजाची लक्षणे आहेत असे सांगून राऊत म्हणाले की थोरांचा सुधारकांचा इतिहास शास्त्रज्ञांचा इतिहास त्यांचे ज्ञानयोगदान त्यांचे सेवा योगदान चरित्र लेखन वाचनाच्या शिवाय कळत नाही कालच्या पिढ्यांचे सर्व प्रकारचे योगदान व इतिहास हा सतत वर्तमान यामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर राहण्यासाठी वाचनाची नितांत गरज असते.
वाचन हेच पुनर्न निर्माण करते वाचन हेच संकल्पनात्मक ज्ञानासाठी आवश्यक असते वाचन हे अन्वेषणासाठी खूप उपयोगी पडते म्हणून वाचन हा छंद तर आहेच पण त्यापलीकडे ज्ञानसाधनेचा तो मार्ग आहे म्हणून शिक्षकांनी पालकांनी विद्यार्थ्यांना वस्तू पलीकडे प्रिय पुस्तके सतत भेट दिली पाहिजेत व विद्यार्थ्यांनी वाचन हाच आपला विकास वाचना शिवाय होणे नाही हे महत्त्व समजावून घेण्याचा वाचन महोत्सवाचा नयार्थ आहे हे पालक समाज यांना पटवून देण्याची शाळांनी गरज आहे असेही राऊत यांनी याप्रसंगी सांगितले.
आजचा समाज हे वस्तूमध्ये नाही ते दृश्य रूप आहे आजचा समाज आजचे विज्ञान आजची प्रगती अक्षरांच्या मध्ये कायम टिकून आहे म्हणून अक्षरांचे जग हे वर्त मनाचे जग असते अक्षरांचे जग हे उद्याचे जग असते अक्षरे हीच मानव मुक्तीची निरंतर वाट असते त्या वाटेवरून चालण्यासाठी अक्षर वेडे होणारे मराठी भाषेतील विद्यार्थी शाळांच्या मधून घडवण्याची नितांत गरज आहे हे शिक्षकांनी गुणवत्तेपेक्षा विचार कौशल्य महत्त्वाचे हे रुजवण्याची गरज आहे असेही राऊत यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगितले.
विद्यालयाचे शिक्षक मोरे सर यांनी प्रास्ताविक केले तर विद्यालयाचे शालाप्रमुख सुनील धनावडे,यादव मॅडम राजापुरे सर यांनी प्रारंभी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थ्यांना व्याख्याते राऊत यांनी लिखित भाषा विचार शिक्षण पुस्तके भेट देण्यात आली दिवदेव चे पठार चे हा नैसर्गिक समृद्ध याचा अभ्यास करून त्यावर नैसर्गिक अहवाल तयार करण्याच्या आश्वासनही शाळेच्या वतीने आभार प्रसंगी देण्यात आले.