
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा दि.१९. नुकत्याच यवतमाळ येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील बॉक्सींग महाराष्ट्र संघ निवड चाचणी मध्ये सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मधील प्रशिक्षणार्थी चि. सैफअलि साजिद झारी (९० किलो)- सुवर्ण पदक, कु. श्रुती सचिन शिंदे (७०-७५ किलो)- सुवर्ण पदक, कु. प्रांजली दिपक रावळ (७५-८०किलो) रौप्य पदक, कु. अपुर्वा प्रशांत कदम (५७ ६० किलो) कांस्य पदक कु. सृष्टी अमोल मोरे (६०-६५ किलो)- कांस्य पदक, चि. रोहन विजय शिंदे (६५-७० किलो)- कांस्य पदक, चि. श्रीराज सतिश शिंदे (८०-८५ किलो) कांस्य पदक अशी ०२ सुवर्ण, ०१ रौप्य व ०४ कांस्य अशी एकुण ०७ पदके प्राप्त केलेली आहेत व सुवर्ण पदक विजेते खेळाडु यांची १९ वर्षा खालील राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे.
तसेच शालेय राज्यस्तरीय बॉक्सींग क्रीडा स्पर्धेमध्ये चि. शौर्य योगेश बनकर याने सुवर्ण पदक प्राप्त करुन आगामी होणाऱ्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांना प्रबोधिनी व्यवस्थापक सुनिल सपकाळ,प्रबोधिनी व्यवस्थापक सॅम्युअल भोरे,एन.आय. एस. बॉक्सींग प्रशिक्षक सागर जगताप,बॉक्सींग प्रशिक्षक पुजा शिंदे यांनी प्रशिक्षण दिले.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील निवड झालेले प्रशिक्षणार्थी व त्यांना उत्कृष्ठ रित्या मार्गदर्शन व प्रशिक्षण दिलेले प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक यांचे उल्लेखनिय कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उप-अधीक्षक (गृह) अतुल सबनीस,राखीव पोलीस निरीक्षक राजु शिंदे ,पोलीस उप-निरीक्षक पोलीस कल्याण व मानवी संसाधन कार्यालय सुनिल चिखले यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पुढील स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.