
स्टार ११ महाराष्ट्र
मेढा.दि.२४. शासनाकडून प्राप्त झालेल्या सरपंच आरक्षणानुसार जावली तालुक्यामध्ये सरपंच आरक्षणाच्या जागा निश्चित करुन प्रवर्ग निहाय वाटप करण्यात आलेल्या आहेत. सन २०२५ ते २०३० या कालावधीत निवडणूक होणाऱ्या १२५ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी सोडत २५ एप्रिल २०२५ रोजी पंचायत समिती सभागृह जावली (मेढा) येथे सकाळी ११.३० वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती जावली (मेढा)तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दिली आहे.
सरपंच आरक्षण सोडतीसाठी जावली तालुक्यातील125 ग्रामपंचायतीसाठी आरक्षित पदाचा तपशील पुढीलप्रमाणे अनूसचित जातीसाठी महिला 5 व खुला 4, अनुसूचित जमातीसाठी महिला 1 व खुला 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिला 17 व खुला 16, सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला 41 व खुला 40 अशा प्रकारे सरपंच आरक्षण सोडत होणार आहे.