छत्रपती शिवाजी महाराजसातारा

किल्ले वैराट गडावर शिवजन्मोत्सवासाठी भरणार शिवभक्तांचा मेळा

जावली.१७. रायगडी मंदिरी वसे माझा राया , चरणाशी अर्पितो अजन्म ही काया , जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती ,प्रथम वंदितो मी तुम्हा शिवराया छत्रपती , शिवकार्यासाठी सदैव तत्पर असे ब्रीदवाक्य घेऊन शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने स्वराज्याचे शास्त्रागार किल्ले वैराटगड येथे रविवार दिनांक 19 /2 /2023 रोजी सकाळी ८/३० वा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे.

या शिवजन्मोत्सव सोहळ्यात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे , अमित दादा कदम , पोलीस उपनिरीक्षक संतोष तासगावकर श्री महंत आबानंदगिरी महाराज ,रूपालीताई भिसे उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमात सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी श्री किल्ले वैराटगड गड पूजन व गड देवता पूजन, छत्रपती शिवरायांचा पाळणा , छत्रपती शिवराय राज्याभिषेक सोहळा ,हिंदवी स्वराज्य ध्वजारोहण व मानवंदना , शिवजन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार , शिवक्रांती शिवभूषण पुरस्कार २०२३ वितरण समारंभ , उपस्थित मान्यवर मनोगत व मार्गदर्शन , शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ ची राष्ट्रगीताने सांगता होणार आहे.

त्यानंतर शिवप्रसाद होणार आहे सदर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गुरुकुल श्री ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था करंडी सातारा यांची वारकरी दिंडी होणार आहे सदर कार्यक्रमांमध्ये शिवक्रांती शिवभूषण पुरस्कार सन्मानार्थी अक्षय इंगवले महाराष्ट्र पोलीस , सामाजिक संस्था मित्रमेळा फाउंडेशन जावली , कमांडो अकॅडमी सातारा , मयुर जाधव पेरा कमांडो युवा मोरया प्रतिष्ठान सातारा , संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था सातारा , श्री वसीम शेख अध्यक्ष जावळी पत्रकार संघ ,श्री सुनील आण्णा धनावडे पत्रकार दैनिक अक्षराज / सत्य सह्याद्री ,श्री संतोष मालुसरे पत्रकार दैनिक धगधगती मुंबई ,तरबेज बागवान पत्रकार दैनिक तरुण भारत , रजीया शेख वनपाल सातारा , दुर्गनाद प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य गडकोट संवर्धन , जिजाऊ महिला ग्रामसंघ कण्हेर महिला बचत गट , यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशिअल वर्क सातारा सामाजिक संस्था यांना यावर्षीच्या शिवक्रांती शिवभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाला कृषी अधिकारी अनिल महामुलकर साहेब बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी राष्ट्रवादी युवक काँग्रेस साताराचे उपाध्यक्ष प्रतीक कदम सुरज जांभळे कमलाताई घोरपडे सरपंच गवडी नवनाथ दादा धनावडे प्रतीक शिंदे गणेश अहिवळे रोहित भाऊ जगताप सोनाली पवार हनुमंत लोहार सर यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ कोल्हेवाडी गणेश वाडी कापसेवाडी सरताळे यांचे लाभणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने स्वराज्याचे शास्त्रागार किल्ले वैराट गडावर शिवजन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्याचे स्वप्नील धनावडे यांनी केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!