आंधळी ग्रामपंचायत मध्ये संकल्प पूर्वक शिवजयंती उत्सवात साजरी…
आंधळी:-दि.२१ फेब्रु(अतुल खरात).मागील काही दिवसापूर्वी सर्व महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी होताना दिसली, पण आंधळी ग्रामपंचायत मध्ये संकल्प पूर्वक १९ फेब्रुवारी ला शिवजयंती साजरी झाली.यामध्ये ज्या प्रमाणे छत्रपती शिवरायांचे रयतेचे राज्य होते त्याच प्रमाने लोकशाहित बहुजनांची बांदिलकी जपणारे विचार आत्मसात करून लोकशाहीला धरून रयतेचे राज्य निर्माण करू, असा संकल्प शिवज्योत कायम विचारांनी ज्वलंत ठेऊन निर्णय घेतला.
आंधळी गाव आमचे सक्षम करू आणि छत्रपती शिवरायांचे विचार गावामध्ये पेरू. त्याचबरोबर -शिव -शाहू -फुले -आंबेडकरी, नरवीर उमाजी नाईक, राजमाता अहिल्यादेवी माँ जिजाऊ यांचा विचार मनामध्ये आत्मसात करून,जात धर्म भेद न बाळगता.जीवन प्रणालीत बदल करू असा संकल्प केला असून,यावेळी आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, उपसरपंच, अभिजित भोसले, ग्रामपंचायत सदस्य, आंधळी विकास सेवा सोसायटी सचिव मा.भिकू खरात(साहेब), माजी. उपसरपंच बापूराव चव्हाण रोहिदास गोरे विजयकुमार वाघमोडे, विजय चव्हाण त्याचबरोबर ग्रामस्थ व शिवअनुयायी उपस्थित होते.



