छत्रपती शिवाजी महाराजमहाराष्ट्रराष्ट्रीय

जावली तालुका अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचे वतीने भव्य मोर्चा

मेढा.दि.२१. आपल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी जावली तालुका अंगणवाडी सेविका मदतनिस यांनी राज्य संघटनेच्या आदेशानुसार दि .२० पासून बेमुदत बंद पुकारला असून मंगळवार दि. २१ रोजी तालुकास्तरीय भव्य मोर्चाचे आयोजन मेढा करण्यात आले होते. या मोर्चास तालुका अध्यक्ष मालन जाधव , संघटक संदिप माने , जयश्री माजगावकर , पतसंस्थेच्या चेअरमन सुनिता पार्टे, यांच्यासह ,सर्व बिटमधील बिटप्रमुख , अंगणवाडी सेविका , मदतनिस हजारोच्या संख्येने उपस्थीत होत्या.
जावली पंचायत समितीच्या प्रांगणातून या मोर्चाला प्रारंभ झाला . पुढे छ. शिवाजी महाराज चौक , लक्ष्मी रोड , तहसिल कार्यालय ,ते पुन्हा छ. शिवाजीमहाराज चौकातून प्रकल्प कार्यालय असा भव्य मोर्चा विविध घोषणा देत काढण्यात आला.. यावेळी गटविकास अधिकारी, तहसिलदार , पोलीस स्टेशन , प्रकल्प कार्यालय यांना निवेदनाच्या प्रती दे०यात आल्या .आयटक सलग्न , महाराष्ट्र राज्य अंगणवाडी आंदोलन कृती समिती ,व सातारा जिल्हा पुर्व . प्राथमिक शिक्षिका , सेविका संघ यांचे आदेशानुसार जावली तालुक्यात बंद पुकारण्यात आला असून तालुकास्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवरायांच्या वारसा प्रमाणे आमचे सरकार चालते असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र त्यांच्याच राज्यात इतर राज्याच्या तुलनेत सेविका व मदतनिस , मिनी अंगणवाडी सेविका यांना सर्वात कमी मानधन दिले जात आहे. मानधनवाढ, मानधनाऐवजी पगार मिळावा, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. , सेवानिवृत्तीनंतर मासिक पेन्शन , ग्रॅज्यएटी, थकित एकरकमी पेन्शन व्याजासह मिळणे, मानधनाऐवजी पगार , इतर राज्याप्रमाणे दयावा व तो दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत मिळावा या व इतर प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत अंगणवाडी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
खर तरं देशाची भावी पिढी सशक्त व सुसंस्कृत घडवण्याचे काम अंगणवाडी स्तरावरूनच होते .मात्र प्राथमिक शिक्षकांचे मानाने खुपच कमी मानधन मिळते.
कोरोनाच्या काळातही या भगीणींनी स्वतःच्या व कुटुबांच्या जीवाची काळजी न करता अहोरात्र काम केले . त्याचा मोबदला शासनाने काय दिली????? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीच आहे. या भगिनींची आजपर्यंत अवहेलनाच झाली आहे. त्यामुळे आता तरी शिंदे सरकारने न्याय द्यावा अशी मागणी अंगणवाडी सेविका , मदतनिस यांच्या मधून होत आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!