महाराष्ट्रसातारासामाजिक

देशातील पाहिली जावली जोडी रन मॅरेथॉन स्पर्धा निसर्गाच्या सानिध्यात उत्साहात संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – मोहन जगताप

सातारा दि.०७ भारत देशातील पाहिल्याचं जावलीरन धावण्याची स्पर्धा आज मोठ्या उत्साहात मेढा मोहाट मार्गे कण्हेर धरणाच्या व डोंगर दऱ्याच्या निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सुमारे ६०० जोड्या धावल्या तर फन रन साठी १२० रनर्स चा सहभाग घेतला होता.
देशातील पहिली जावली जोडी रन स्पर्धा रविवार दि.०७ रोजी मैत्री दिनाच्या औचित्यावर मेढा येथे हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी अनोख्या मॅरेथॉनमध्ये हजारो रनर्स, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. रनर्स स्पोर्ट असोसिएशन जावली कडून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.जावली जोडी रन ही देशातील पहिलीच जोडी मॅरेथॉन असून गेल्या तीन वर्षांपासून ही मॅरेथॉन मेढा येथे संपन्न होत आहे. मॅरेथॉनचे या तिसऱ्या वर्षी मॅरेथॉन मध्ये हजारो रनर्स नी आपला सहभाग नोंदविला होता. भारतात अशा पद्धतीची ही पहिलीच मॅरेथॉन असल्यामुळे या स्पर्धेत राज्यातील तसेच राज्याबाहेरील स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला होता. याशिवाय मॅरेथॉनमध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांनीही आपला सहभाग नोंदविला होता. ही मॅरेथॉन मेढा – पिंपरी- गांजे ते पुन्हा गांजे-पिंपरी- मेढा या निसर्गरम्य मार्गावर संपन्न झाली. यावेळी मॅरेथॉनमध्ये पुरुष पुरुष जोडी गटात ऋषभ शिंदे – प्रथमेश यादव, अजित निकम -नितीन थोरात,महादेव लेंभे – अजय भैताडे विजयी झाले आहेत. स्त्री- स्त्री गटात रोहिणी खंदारे-तनुषा बनसोडे, दिपाली खरात- माधुरी शिवदे, दिपाली महाजनी -आराधना केंजळे या महिला विजयी झाल्या आहेत. तर महिला पुरुष गटात शुभांगी खांडेकर – वसंत लकडे,अलमास मुलाणी-किरण गेजगे,संगीता उबाळे-उद्धव इंगवले या जोड्या विजयी झाल्या आहेत.


जोडी रन मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी माऊली डेव्हलपर्स, यशवंत हॉस्पिटल, मीनाक्षी हॉस्पिटल, शहा डॉक्टर, अजिंक्य उद्योग पाचगणी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रनर्स स्पोर्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ डिगे, पंकज नागोरी,संजय धनावडे, सुहास पाटील, विलास डिगे, बनकर व असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी कष्ट घेतले.
यावेळी माज़ी आ. नरेंद्र पाटील, सदाशिव सपकाळ ,वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, तहसीलदार राजेंद्र पोळ, नायब तहसीलदार संजय बैलकर,जेष्ठ पत्रकार मोहन जगताप, सपोनि अमोल माने यांची उपस्थिती होती.विविध धावपटू महिला पुरुष ग्रुपच्या वतीने विविधता दर्शक मनोरंजक अशा गाण्यांनी आपली अदाकारी सादर केली उपस्थीत मान्यवरांचे स्वागत संजय धनावडे यांनी केले.

जावली तालुक्यातील खेडेगावातील सर्वसामान्य स्पर्धकांना स्पर्धेच्या युगात ही स्पर्धा म्हणजे प्रोत्साहनपर असून गत दोन वर्षात कोरोना कालावधीत ही स्पर्धा झाली नसली तरी पुढील वर्षापासुन आम्ही जावलीकर हि स्पर्धा घेवून ग्रामीण जावली तालुक्याचे नाव देश पातळीवर उंचावण्यास सर्वतोपरी प्रयत्न करणार   असे प्रतिपादन यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.              

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!