जागतिक महायुद्धात शहीद हुतात्मा स्मारक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराने वादात…

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – मोहन जगताप
मेढा.दि.०८. जागतिक महायुद्धातील मराठा लाईट इन्फट्री युनिट 1914 ते 1919 या कालावधीतील कूसावडे पोस्ट बामणोली या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मायभूमितील हुतात्मा शहीद जवान कोंडीबा गोपाळ मरागजे यांच्या हुतात्म्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शतकापूर्वी मेढा बाजारपेठेतील मुख्य चौकात स्मारक उभारण्यात आले.
विटा मेढा मार्गे महाबळेश्वर या रस्ता रुंदीकरण काम चालू झाल्याने हे स्मारक अडथळा ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व रोडवेज सोल्युशन या कंपनीच्या वतीने या स्मारक पुनर्स्थापित करण्यासाठी जानेवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या समोरील जागेत मान्यवर पदाधिकाऱ्यांनी व अधिकारी यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.
दरम्यानच्या काळामध्ये हे स्मारकाचे बांधकाम पाडून गेले सात महीने दुरवस्था व अस्ताव्यस्त पडल्याचे दिसत होते.सध्यातर या स्मारकाचे अनेक अवशेष चिखल मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले आहेत या ठिकाणी पडलेल्या स्मारकाच्या अवशेषावर दारूच्या बाटल्या ही पडल्या असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले आहे.०९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे अभिवादनासाठी तालुक्यातील व रायगड, ठाणे जिल्ह्यातील शहीद हुतात्मा मरागजे कुटुंबातील सर्व लोक येत असतात आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्याकाळी मरागजे यांचे वंशज आनंद सिताराम मरागजे यांनी भेट दिली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या नव्या बांधकामास हस्तक्षेप करून पूर्वी प्रमाणे स्मारकाचे बांधकाम करण्याची मागणी केली.

बाजूला दगडी स्मृति स्तंभाचे चिखलात पडलेले अवशेष
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावरील गलथानपणाच्या कारभाराचा निषेध करून अशा पद्धतीने स्मारकाची विटंबना करणार्या अधिकार्याचा तीव्र निषेध व्यक्त करून अशा प्रवृत्तीला आला आळा घालण्याची मागणी आनंद मरागजे व आनंद सपकाळ यांनी आमच्या प्रतिनिधी कडे केली…..





