स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जवळवाडी येथे 165 कुटुंबांना राष्ट्रध्वज वाटप

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर.दि.०८.आज ग्रामपंचायत जवळवाडी यांचे वतीने भैरवनाथ मंदिरामध्ये ग्रामसभेच आयोजन करण्यात आले होते.भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा स्वातंत्र्याच्या अमृत माहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत आज गावामध्ये 165 कुटुंबांसाठी राष्ट्रध्वज खरेदी केले. त्याच बरोबर गावातील बचत गटातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यातही बचत गटातील 110 महिलांनी सहभाग घेतला व तपासणी करून घेतली.
गावामध्ये शंभर टक्के घरांवर हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा फडकवन्याचे आव्हान सौ सुरेखा मर्ढेकर सरपंच ग्रामपंचायत जवळवाडी यांनी केले त्याचबरोबर शासनाच्या नियमाप्रमाणे दिनांक आठ ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे नियोजन ही ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेले आहे.
गावामध्ये अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशाताई यांच्या माध्यमातून हर घर झेंडा मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी सरपंच सुरेखा मर्ढेकर, उपसरपंच शंकरराव जवळ ग्रामपंचायत सदस्य गीता ताई लोखंडे ,कल्पना जवळ ,शांताबाई जवळ, राजेंद्र जावळे ,राजेंद्र निकम तलाठी शंकर सावंत ,ग्रामसेवक वैभव निकम, त्याचबरोबर भैरवनाथ तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष साहेबराव धनावडे, सुभाष जवळ ,शंकरराव जवळ ,सर्जेराव जवळ,सुभाष जवळ,सचिन जवळ,बचत गटाच्या अध्यक्षा राजश्री पाटील व गावातील सर्व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.



