स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मेढा नगरंचायतीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – अभिजीत शिंगटे
मेढा. दि.१२. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मेढा नगरंचायतीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला. मेढा नगरपंचायतीच्या व सहकारी यांच्या मदतीने या
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोहिमेत जावळीचे
तहसिलदार मा.तहसिलदार श्री. राजेंद्र पोळ व त्यांचे सर्व अधिकारी /कर्मचारी , मेढा पोलीस स्टेशनचे स. पो .नि. अमोल माने व त्यांचे सर्व अधिकारी /कर्मचारी सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल श्री. आर.एस. परदेशी, श्रीमती अंकिता तरडे व त्यांचे अधिकारी/ कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे मुुख्याधिकारी श्री.अमोल पवार तसेच नगरपंचायतीचे अधिकारी शहर समन्वयक श्री. सचिन घाटूळे ,नोडल अधिकारी श्री. प्रमोद कुंभार, लेखाधिकारी श्री. प्रसाद बटवाल,स्थापत्य अभियंता मंगेश गोरे, पापा पानसरे, सचिन करंजेकर ,विकास जवळ,आशिष कुंभार,राजेश पुजारी इत्यादींच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम
सातारा महाबळेश्वर रोड दुभाजक मेन चौक तसेच सामाजिक वनीकरण कार्यालय , तहसिल कार्यालय व आय टी आय कॉलेज रोड मेढा या ठिकाणी करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण संवर्धन करण्याच्या अनुषंगाने साग ,जांभूळ ,चिंच पेरू इ. देशी प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आली तसेच रोड दुभाजक मध्ये हरित शुशोभिकरण करिता विविध प्रकारच्या फुलांची रोपे लावण्यात आली . या रोपांची योग्य ती काळजी घेणे सामाजिक जबाबदारी बनली असून या स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यामुळे मेढा आणि परिसर पुन्हा एकदा बहरलेला दिसेल अशी आशा नागरीकांतुन व्यक्त होत आहे.



