गांजे शाळेत सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रम भारत पाक युद्धाच्या गप्पात रमले बालचमू ….

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – संजय वांगडे
कुसुंबी.दि.१२.जिल्हा परिषद केंद्रशाळा गांजे ता जावली येथे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव सपूर्ण भारतदेशात अभिमानाने साजरा होत आहे या प्रसंगाचे औचित्य साधून येथील आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माजी सैनिक श्री अर्जून देशमुख यांनी भारत पाक युद्धाच्या आठवणी सांगताना प्रत्यक्ष युदध भूमीवरचे प्रसंग ऐकूण विद्यार्थांच्या अंगावर शहारे आले . गांजे गावचे सुभेदार मेजर हणमंत चिकणे यांनी युद्ध भूमि युदध डावपेच इ.गोष्टीची माहिती दिली .गावातील श्री सुरज चिकणे यांनी मुलांना हार के बाद ही जीत है । कठोर प्रशिक्षणातून सैनिकाची कशी जडणघडण होते.याची माहिती दिली .

श्री अक्षय चिकणे फौजी यांनी बर्फाळ प्रदेशातील अविस्मरणीय कामगिरी व जखमी सैनिकासाठी केलेली आपरेशन मोहिम मुलांना फारच आवडली, गांजे गावचे भाग्य आहे की या गावात अनेक तरुणी तरुणांना देशसेवा करण्याचे भाग्य मिळाले तालुक्यातील महिला सैनिक होण्याच्या बहुमान चिकने हिच्या रुपात मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.एकच वेळी ४ सैनिक अधिकाऱ्यांच्या भेटीने शाळेत देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.विद्यार्थांनी सैनिकांची घेतलेली मुलाखत सैनिकाना सुद्धा खूप आवडली .
यानंतर मुलांनी सैनिकांसाठी भेटकार्ड भेट दिली .
मुलीनी आपल्या फौजी भावांना राखी बांधून त्यांच्या रक्षणा साठी भगवंताकडे प्रार्थना केली . गांजे गावात अरुण चिकणे, सुभाष धनावडे, महेश चिकणे, श्रीकांत जवळ, विशाल चिकणे ,सुरज चिकणे, योगेश चिकणे, अक्षय चिकणे, अधिक चिकणे, महिला सैनिक शिल्पा चिकणे हे सर्व सैनिक देशसेवा बजावत आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन श्री.शंकर देशमुख व सौ . शैलजा रणवरे यांनी केले.श्री.प्रशांत गायकवाड यांनी सैनिकांचा सन्मान केला. सौ.भोसले मॅडम यांनी आभार मानले .
शाळेच्या या सुंदर उपक्रमाचे शाळा व्य समिती अध्यक्ष श्री . विलास शिंदे व शिक्षण तज्ञ – श्री रामचंद्र चिकणे योनी कौतुक केले .



