महाराष्ट्रसातारासामाजिक

रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपन ही काळाची गरज… तहसीलदार राजेंद्र पोळ

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क युवराज धुमाळ

मेढा. दि.१२. केळघर ते धामनेर पर्यंत रोडवे सोल्युशन प्रा.लि. पुणे यांच्या वतीने व जावली प्रशासनाच्या सहकार्याने स्वातंत्र्याचा 75 वा अमृत मोहत्सवा निमित्त सात हजार पाचशे झाडे व फुलझाडे लावून संपन्न झाला. गेली पंधरा दिवस या वृक्षारोपनाचे काम सुरू आहे.

वड,पिंपळ,महुगणी,जंभुळ,गुलमोहर,रेनट्री,सिलवरओक,बोगणवेल,पिवळी बिट्टी,अशा प्रकारच्या झाडांची लागवड रस्त्याच्या दोन्ही बाजूने व डिवायडर मध्ये फुल झाडांची लागवड मेढा येथून करण्यात आली आहे. या वृक्षारोपन कार्यक्रमासाठी जावली तहसिलदार राजेंद्र पोळ ,स.पो.नि.अमोले माने,वनक्षेत्रपाल आर.एस. परदेशी,वनक्षेत्रपाल सामाजिक वनिकरण अंकिता तरडे, बी.डी.ओ.रमेश काळे,सार्वजानिक बांधकाम उपअभियांता सारंग इनामदार,रोडवे सोल्युशनचे सतिष पाटील,अजित शिंगटे इ,मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना तहसिलदार राजेंद्र पोळ म्हणाले झाडे लावणे काळाची गरज आहे तालुक्यातील प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूने अशा प्रकारे वृक्षारोपन करणार आहोत.ती सर्व झाडे प्रत्येक ग्रामपंचायतीला जगवण्याची जबाबदारी देणार असल्याचे बोलत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस पाटील सुहास भोसले यांनी केले व आभार वनरक्षक राहूल रनदिनवे यांनी मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!