श्री क्षेत्र कुसूंबी येथील काळेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत ध्वज वाटप…!

स्टार११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – संजय वांगडे
कुसुंबी. दि.१४. जावली तालुक्यातील कुसुंबी येथे हर घर तिरंगा अभियानाचे औचित्य साधून काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांचे वतीने मोफत ध्वज वाटप करण्यात आले. मातृभुमीचे आपण पुत्र आहोत, या संस्कृतीचे आपण वारस आहोत,या राष्ट्राचे आपण एक जबाबदार घटक आहोत. म्हणूनच या देशाशी,भूमीशी,समाजाशी आपण सैदव कृतज्ञ असले पाहिजे. यांचे ऋणी असले पाहिजे. व्यक्तीश: आणि संघटितरीत्या आपल्या सर्वांना हे ऋण फेडायचे आहे…. या वर्षी संपूर्ण भारतात कन्या कुमारी ते काश्मीर पर्यंत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवात साजरा होत आहे.

ग्रुप ग्रामपंचायत कुसूंबी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने शुक्रवार दि.१२-८-२०२२रोजी कुसूंबी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व वाड्या वस्तीवर घरोघरी ” हर घर तिरंगा मोहीम वाटप कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा कुसूंबी मुरा, येथे सकाळी ११-००वाजता व श्री काळेश्वरी मंदिर सभामंडप येथे दुपारी ३-३० संपन्न झाला या कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूल कुसूंबीचे मुख्याध्यापक श्री.पाटील सर यांनी ध्वज उभारणी संदर्भात उपस्थित ग्रामस्थ यांना सविस्तर माहिती दिली,कुसूंबीच्या ग्रामसेविका सौ.रुपाली धाराशिवकर मँडम यांनी ध्वज उभारताना घ्यावाची काळजी या बाबी कथन केल्या. तसेच श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट चे सचिव यांनी स्वातंत्र्य पूर्वीचा भारत व आजचा भारत या विषयावर आपले विचार मांडले “हर घर तिरंगा” मोहीम यशस्वी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत असलेल्या अंगणवाडी सेविका,आशा सेविका,मदतनीस,प्राथमिक माध्यमिक शिक्षक ,सामाजिक कार्यकर्ते यांचा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने सन्मान करण्यातआला सूत्रसंचालन काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त श्री.संतोष चिकणे यांनी केले
या कार्यक्रमास श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रामदास वेंदे,उपाध्यक्ष श्री.विजय वेंदे सचिव श्री.किसनराव चिकणे, विश्वस्त श्री.बाजीराव चिकणे,श्री.ज्ञानेश्वर चिकणे,कुसूंबीच्या सरपंच सौ. पुष्पाताई चिकणे, ग्रामस्थ,युवक,महिला, उपस्थित होते.
नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम घेत असलेल्या श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांनी केलेल्या ध्वज वाटप कार्यक्रमाचे जावली तालुक्यातून विशेषतः वेण्णा दक्षिण विभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.



