महाराष्ट्रसातारासामाजिक

अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज उभारून अभिमानाने त्याचे पावित्र्य जपा…तहसिलदार राजेंद्र पोळ

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – अभिजीत शिंगटे


मेढा.दि.१४ . अमृत महोत्सवानिमित्त सर्वत्र राष्ट्रध्वज उभारला जाणार असून तो सर्वांनी उभारावा परंतु त्याचे अभिमानाने पावित्र्यही जपा असे प्रतिपादन जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी केले.


देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत महोत्सव वर्षानिमित्त “घर घर तिरंगा हर घर तिरंगा ” या मोहिमेअंतर्गत 13 ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर ऑफिसवर कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवण्याचा संकल्प केंद्र सरकारने आयोजित केला असून सर्वानी काळजीपूर्वक ध्वजाचा अवमान होणार नाही या जाणीवतेने या संकल्पनात सहभाग नोंदवावा असे ही सुचित केले आहे.
ही मोहीम ‘नागरीकांपर्यत तसेच गावातील प्रत्येकघराघरापर्यंत पोहोचली पाहिजे या जाणीवतेने प्रशासन व नागरीक यांच्या माध्यमातुन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री अमोल माने साहेब नगरपंचायत चे मुख्याधिकारी सन्माननीय श्री अमोल पवार साहेब तसेच श्री विकास देशपांडे,श्री धनंजय खटावकर, श्री सुरेंद्र पंडित,श्री सुरेश जंगम,डॉक्टर श्री संपतराव कांबळे, श्री राजेंद्र मुळे, श्री विठ्ठल देशपांडे,श्री.संजय सपकाळ तसेच उपस्थितांनी मिळून घर घर तिरंगा हर घर तिरंगा ही संकल्पना घरा -दारा पर्यंत पोहचवुन नागरिकांना तिरंगा ध्वज चे वाटप करण्यात आले आणि योग्य त्या सुचना देवून ध्वज उभारायाचे कसे याबाबत माहिती देण्यात आली.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!