महाराष्ट्रसातारासामाजिक

मेढा येथिल म.गांधी वाचनालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमाने साजरा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – सुरेश पार्टे

मेढा.दि.१५. महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांचेवतीने१५ऑक्टोबर २०२२भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन"म्हणून वाचनालयाच्या स्व. विजया थत्ते सभागृहात मान्यवरांचे व शालेय विद्यार्थाच्या उपस्थीतीत विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. प्रारंभी जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीभाई देशमुख यांचे हस्ते दीपप्रज्वलन प्रतिमा पुजन करून करण्यात आला,यावेळी पञकार भास्कर धनावडे,पञकार सोमनाथ साखरे,प्राथमिक शिक्षीका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात आदर्श शिक्षिका शिल्पा फरांदे मॅडम, संजिवनी मुळे मॅडम, सरोजिनी राक्षे मॅडम ,पञकार भास्कर धनावडे ,यांनी डॉ .ए .पी .जे. अब्दुल कलाम यांच्या आठवणी सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, याप्रसंगी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते . तर उपस्थीत विद्याथ्र्यांनी थोर, महापुरूषांच्या आत्मचरित्राचे वाचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष नारायणराव शिंगटे गुरुजी यांनी केले,कार्यक्रमास सचिव धनंजय पवार, अंतर्गत हिशोब तपासणीस विठ्ठल देशपांडे, संचालक रघुनाथ ( बाळासाहेब) जवळ, शशिकांत कदम, अशोक दिक्षित,संचालिका स्वाती दिक्षित, शैला सपकाळ, उपस्थित होते, संस्थेचे अध्यक्ष पत्रकार सुरेश पार्टे, सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा शोभा शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल आशा मगरे , सहायक ग्रंथपाल इमताज शेख, लिपिक माधवी कदम यांनी विशेष परीश्रम केले तर संचालक विठ्ठल देशपांडे यांनी आभार मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!