श्री भैरवनाथ विद्यामंदिर केळघर येथे येथे वाचन प्रेरणा दिन आज उत्साहात संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज युवराज धुमाळ
केळघर. दि.१५.केळघर ता. जावली येथे आज १५ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज श्री भैरवनाथ विद्यामंदिर केळघर येथे वाचन प्रेरणा दिन तसेच वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला व यावेळी केळघर येथिल सचिन पेपर एजेन्सीचे मालक श्री सुभाष रघुनाथ गाडवे यांचा वृत्तपत्र विक्रेते दिनानिमित्त आज सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वाचन प्रेरणा दिनही साजरा करण्यात आला.

याप्रसंगी ग्रंथालयाकडून ग्रंथ प्रदर्शन तसेच वाचन कट्टा उपक्रम घेण्यात आले. तसेच ‘स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश हे नक्की मिळते असे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वायदंडे यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केले.

या कार्यक्रम प्रसंगी केळघर गावचे सरपंच रविंद्र सल्लक श्री राजेंद्र गाडवे,ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे,समजसेविका सौ.उषाताई उंबरकर,पत्रकार संजय दळवी, संदिप गाडवे, युवराज धुमाळ, भाऊ जाधव,संतोष बेलोशे,रघुनाथ पार्टे, विद्यालयातील मुख्याध्यापक श्री दिलीप वायदंडे, देवकर सर, मदने सर, पडवळ सर, खंडागळे मॅडम मोरे मॅडम, जाधव सर,जाधव मॅडम,दांडेकर सर आहेर सर,पवार शिनगारे,वांगडे सर उपस्थित होते.




