हुतात्मा शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक प्रेरणादायी स्फूर्तीदायक व भव्य स्वरूपात झाले पाहिजे…. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ
केळघर.दि.२२. सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राच्या कर्तुत्वाचा सन्मान गौरव मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री मा. शंभुराज देसाई यांनी केला.अशी माहिती हुतात्मा शहीद तुकाराम ओंबळे यांचे बंधू शिंदे सरकार गटाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथजी ओंबळे यांनी दिली आहे.

वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची बोंडारवाडी धरण व शहीद तुकाराम ओबळे स्मारक याविषयी भेट घेतली,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बोंडारवाडी धरणाचा प्रकल्प व हुतात्मा शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे कामाचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावायचा आहे, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.यावेळी त्यांना सुचना दिल्या,अशी माहिती शिंदे सरकार गटाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथजी ओंबळे यांनी दिली.

हुतात्मा शहीद तुकाराम ओंबळे यांनी २६/११ च्या हमल्यात अजमल कसाब सारख्या खतरनाक दहशतवाद्याला पकडून खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे काम केले आहे, खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मारकाला एवढा विलंब होतोय ही शोकांतिका आहे हुतात्मा शहिद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक अतिशय भव्य व देखणे झाले पाहिजे अशा सुचना सर्व अधिकाऱ्यांना देऊन स्मारकासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले आहे.ओंबळे साहेबांचे स्मारक हे येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी स्फूर्तीदायक व भव्य स्वरूपात झाले पाहिजे अशा सूचना साताऱ्याच्या जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्मारकाला किती निधी लागेल याची विचारणा केली असता पालकमंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी कमीत कमी दहा कोटी रुपये लागतील असे सांगितले,असता दहा कोटीच नाही अधिकचा जेवढा निधी लागेल तो तुम्हाला मिळाला जाईल परंतु ओंबळे साहेबांचे स्मारक हे भव्य आणि दिव्य झालं पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथजी यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.



