कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ संजय बाबाजी सपकाळ यांची दूरदर्शन सह्याद्रीवर उद्या सायंकाळी ६.०० वाजता मुलाखत

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ
मेढा.दि.६. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी जिल्हा अहमदनगर येथील कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ संजय बाबाजी सपकाळ ( रा .सावली, ता जावळी ) यांचे किमान आधारभूत किंमत धोरण या विषयावर उद्या सोमवार दि. ७.११.२०२२ रोजी शेतकरी वर्गाला किमान आधारभूत किमंत म्हणजे काय? ते कोण ठरवते? कसे ठरवते? या विषयी असणाऱ्या अनेक शंकाचे समाधान करण्याच्यादृष्टीने दूरदर्शन सह्याद्रीकडून त्यांची मुलाखत ठीक संध्याकाळी ६.०० वाजता आयोजित केली आहे आणि त्याचे प्रसारण दि. ७.११.२०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता आणि ८.११.२०२२ रोजी सकाळी ६.०० वाजता होणार आहे तरी अधिकाधिक शेतकरी वर्गाने या प्रसारणाचा लाभ घ्यावा आणि आपली शेती अधिक फायदेशीर कशी होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. संजय बाबाजी सपकाळ जन्म सावली,ता. जावळी, जि. सातारा येथील असून ते भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत.त्यांचे पदवीचे शिक्षण कृषी या विषयात डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून पूर्ण झाले आहे, त्यांचे पदव्युत्तर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर येथून कृषी अर्थशास्त्र या विषयात विशेष प्रावीण्यासह पूर्ण झाले आहे. त्यांनी आपले आचार्य (Ph.D. ) शिक्षण भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली येथून सुवर्ण पदकासह देशात पहिल्या पाच मध्ये येऊन विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहे.
त्यांनी आपल्या आचार्य पदवीच्या शिक्षणासाठी भारतामध्ये पहिल्यांदाच हवामान बदल अनुकूल तंत्रज्ञानाचा भारतीय शेतीवर होणारा परिणाम याचा अभ्यास केला आणि भारत सरकारला हवामान बदलापासून शेतीचे संरक्षण कसे करावे याविषयाशी धोरण ठरवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.. त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेची कनिष्ठ आणि वरिष्ठ संशोधन फेलोशिप प्राप्त झाली आहे. ते नेट परीक्षा पास आहेत .

सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कृषी अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी 3 पुस्तके, 25 शोधनिबंध, 30 तांत्रिक शोधनिबंध आणि 150 हुन अधिक शेतकरी जागृतीविषयक लोकप्रिय लेख प्रकाशित केले आहेत. त्यांची १५ हून अधिक कार्यक्रम विविध आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली आहेत.




