महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईराजकीयसातारासामाजिक

मेढा ता.जावली येथे नगरपंचायत समोर सोमवारी बोंबाबोंब आंदोलन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – पत्रकार सुरेश पार्टे


मेढा. दि.०५.मेढा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमधे रूपांतर झाले खरे पण रहिवाशांना कोणताही फायदा न होता तोटाच अधिक दिसत असल्याने सर्व खातेदार, रहिवाशी नागरीक व आता शेतकरी वर्गही मोठ्या प्रमाणात नाराज झाला असल्याने सोमवार दि.७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२वा. ऐन दिवाळीत नगरपंचायत समोर शिमगा करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.
नगर रचना विभाग यांनी केलेल्या सर्वे नुसार मेढा नगरीच्या विकासाचा प्रस्तावीत आराखड्याचा नकाशा नगरपंचायती मधे गेल्या पंधरा दिवसापुर्वी लावला असून हा नकाशा पाहिल्यावर अनेक व्यापारी, रहिवाशी व शेतकरी यांच्या पाया खालची जमिनच सरकली आहे.या सर्वांनाच अन्न पाणी गोड लागेना असे झाले आहे.कोणाची दुकानची जागा,प्रस्तावीत व्यवसायाची जागा तर गुंठ्यातील रस्त्यालगत असणारी शेतजमिन आरक्षित केल्याने दिवाळीचा सण गोड होण्याऐवजी कडू झाला आहे.


या बाधित रहिवाशी व शेतकर्‍यांनी एकत्र येवून नगरपंचायतीच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. नगरपंचातीला स्थापन होवून पाच वर्षे संपली आहेत.या काळात बांधल्या गेलेल्या इमारतींची अधिकृत रित्या नोंद झालेली नाही.अवास्तव वाढीव घरपट्टीने पुरते बेजार झालेले मिळकत धारक त्या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत तोच मेढा नगरीच्या अवास्तव कल्पना दर्शविणारा टाउन प्लॅनचा शेतकरी रहिवाशांना मातीत घालणारा नकाशा तयार करून नगरपंचायतीने तिसरा धक्का दिला आहे.
लोकप्रतिनीधी,नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी पुढे येवून रहिवाशांच्या मिळकती अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते.घरपट्टी करातही भरमसाठ वाढ झाल्यावर ती रद्द करण्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे होते. मेढा नगरीच्या विकासाच्या अवास्तव कल्पना घेवून बनविण्यात आलेल्या टाउन प्लॅनचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असावे यावेळी लोकप्रतिनिधींनी मेढा नगरीत असणार्‍या शासकिय जागा विचारात घ्यायला हव्या होत्या पण तसे होताना दिसत नाही.


या सर्व अनागोंदीवर बोलायला कोणीच पुढे येत नसल्याने शेवटी वैतागलेले मिळकत धारक,बाधित रहिवाशी व शेतकरी एकत्र आले असून सोमवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येवून नगरपंचायत समोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिध्दिपत्रकात जाहीर केले आहे.

सातारा महाबळेश्वर रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्यात असताना नगरपंचायती चे आराखड्यामध्ये मुख्य रस्त्यांचे अंतर वाढविल्याने मेढा बाजार पेठच अस्तित्वातच राहाणार नसून त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसणार आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!