
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज
कुसुंबी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन ने 32 व्या किशोर- किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन फलटण येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात झालेल्या खो-खो सामन्यात महाराष्ट्र संघ विजेता झाला या विजयामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी, सिंहाचा वाटा ठरलेली पिंपरी गावची सुकन्या कुमारी प्राची भरत वांगडे हिचा कृषीप्रधान पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आणि सन्मान करण्यात आला.जिद्द,चिकाटी,सातत्य तसेच आई वडिलांचे असलेले प्रोत्सान च्या जोरावर प्राची ने हे यश खेचून आणले.
फलटण शहरात खो- खो खेळाला ऐतिहासिक परंपरा आहे त्या शहरास खो- खो ची पंढरी म्हणून ओळखले जाते या स्पर्धेमध्ये राज्यातील साठ संघाचा समावेश होता २९ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या स्पर्धेमध्ये तीस राज्यांमधील साठ संघ सहभागी झाले होते.

किशोरी खो -को संघात धनश्री कंक, प्राची वांगडे, धनश्री तामखडे, स्वप्नाली तामखडे, विद्या तामखडे,कृतिका अहिर, श्रेया नवले, आर्या वाघ, मृण्मयी नागवेकर, साक्षी लिंगायत, संचिता गायकवाड ,सृष्टी सुतार, मैथिली पवार, प्राजक्ता बनसोडे, रोहिता भवर, यांचा समावेश होता या संघाला प्रशिक्षक म्हणून विनायक मनसुख लोकेश नेवाळे व्यवस्थापिका शुभांगी गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले या विजयी संघाचे मा.संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
प्राची वांगडे हिचे ग्रामस्थ मंडळ पिंपरी, नवजवान तरुण मंडळ पिंपरी,तसेच सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले.



