महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसातारासामाजिक

गावोगावी स्पर्धा परिक्षा केंद्र निर्माण व्हावी…..
सरपंच सौ.सुरेखा सुरेखा मर्ढेकर

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क….


कुसुंबी प्रतिनिधी. दि २२.जवळवाडीता. जावळी येथील ग्रामस्थांनी आजभैरवनाथ करीअर कट्टा उपक्रम सुरू केला या प्रसंगी सरपंच सौ. सुरेखा सुरेखा मर्ढेकर बोलत होत्या. गावच्या विकासासाठी आज एक पाऊल पुढे पडले याचा मनस्वी आनंद होत आहे. तसेच गावातील युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
प्रा प्रकाश जवळ सर यांनी ही अत्यंत उपयुक्त संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली त्याबदल त्यांचेही आभार मानले.पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना ४२४० रु. इतक्या रकमेची पुस्तके मा प्रा प्रकाश जवळ सर, श्री राजेंद्र जवळ, श्री संदीप मोरे या ग्रामस्थांकडून या उपक्रमात देण्यात आली.

यावेळी सरपंच सौ सुरेखा मर्ढेकर उपसरपंच शंकर जवळ ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जवळ राजेंद्र निकम सौ कल्पनाजवळ,भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष पैलवान सागर जवळ, मंडळाचे माजी अध्यक्ष साहेबराव धनावडे ,ग्रामसेवक वैभव निकम,प्राध्यापक प्रकाश जवळ सर, शंकर भाऊ जवळ आनंदा जवळ, संपत डिगे, नामदेव जवळ, अशोक जवळ इ मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मा.सरपंच यांनी या पुस्तकांसाठी आवश्यक असणारे कपाट देण्याचे जाहीर केले.या उपक्रमातून येणाऱ्या तलाठी, आरोग्य सेवक, क्लार्क, पोष्ट इ. भरतीची पुस्तके व १०वी, १२वीच्या मुलांसाठी आवश्यक पुस्तके लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
सर्व ग्रामस्थांनी आपल्या मुलांना सदर पुस्तकांचा लाभ घेण्यास प्रोत्साहन दयावे असे आवाहन अध्यक्ष सागर जवळ यांनी केले. सतिश मर्ढेकर यांनी आभार मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!