श्रवणदोषांच्या पुनर्वसनाच्या व आरोग्य शिबिराबाबत डॉ.राजू अरख यांची भेट घेऊन कार्यक्रमाबाबत केली चर्चा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ

मुंबई.दि.२२.शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ.शुभाताई राऊळ,कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) MSJ&E, भारत सरकार मुंबई या रुग्णालयाचे संचालक डॉ.राजू अरख यांची भेट घेऊन श्रवणदोषांच्या पुनर्वसनाच्या विविध पैलूं,आरोग्य शिबिरे,रुग्णालयाचे विविध पदवीपूर्व,पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील कार्यक्रमा बाबत तसेच संघटनेचे पुण्यातील कार्यकर्ते डॉ.प्रमोद रंधावे यांनी पाठवलेल्या १३ वर्षीय कु.ऋषिकेश राऊत कानाच्या आजारा संदर्भात सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यात आला.

त्याच प्रमाणे संचालक डॉ.श्री.अरख यांचा सन्मान करून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.

त्याप्रसंगी संघटनेचे मुंबई अध्यक्ष डॉ.प्रसाद पवार, श्री.अमोल वंजारे,सौ.सुप्रिया ठोंबरे-पाटणे,श्री.शिवाजी झोरे श्री.विनायक कानसकर, श्री.सिद्धेश मोहिरे, श्री.अभिजीत देसाई, श्री.प्रवीण ढवळे,श्री.मयुरेश मोहिरे,श्री.लीतेश केरकर,श्री.किशोर भिलारे,श्री.सुमित गुप्ता व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




