महाराष्ट्रसातारासामाजिक

निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आयकर सूट मिळण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील सादर करण्याचे आवाहन

स्टार ११महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ

सातारा दि.१५. सातारा जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता आयकर सूट मिळण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील लेखी अर्जासह दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन विभागात सादर करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी केले आहे.

तपशीलात बँकेचे नाव,शाखा,खातेनंबर,पॅनकार्ड नंबर नमूद करणे आवश्यक आहे. पॅनकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी. OLD TAX REGIME व NEW TAX REGIME यापैकी योग्य पर्याय निवडावा. आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालाची मदत घ्यावी. जे निवृत्तीवेतन धारक TAX REGIME ची निवड वेळेत कळविणार नाहीत त्यांची पूर्वीप्रमाणे OLD TAX REGIME मध्ये वजावट करण्यात येईल. जे निवृत्तीवेतन धारक त्यांच्या गुंतवणुकीचा तपशील दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत सादर करणार नाहीत अशा निवृत्तीवेतन धारकांची माहे जानेवारी 2023 व फेब्रुवारी 2023 च्या निवृत्ती वेतनातून आयकर पात्र रक्कम कपात करण्यात येईल.

60 वर्षावरील निवृत्तीवेतन धारकांचे सर्व फरकासह वार्षिक उत्पन्न रुपये 5,00,000/- (रुप. पाच लाख) च्या आत आहे अशा वार्षिक उत्पन्न आयकर पात्र नसणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी गुंतवणूक तपशील सादर करावयाची आवश्यकता नाही. आयकर पात्र निवृत्तीवेतन धारकांनी विहीत वेळेत गुंतवणूक तपशील सादर करावा. दि. 10 जानेवारी 2023 नंतर सादर करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा विचार केला जाणार नाही, असे श्री. पवार यांनी कळविले आहे.

0 0 0 0

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!