मामुर्डी ता.जावली येथिल छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे संस्थापक आज हरपले….

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —–
मेढा प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराजाचे पदस्पर्शाने पावन झालेल्या मामुर्डी गावचे सुपुत्र ,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मामुर्डी चे संस्थापक निर्मल ग्रामपंचायत चे माजी सदस्य नेहमी सत्याची बाजु घेणारे निर्भिड व्यक्तीमत्व विष्णू लक्ष्मण धनावडे यांचे वृद्धापकाळाने मामुर्डी येथे राहते घरी निधन झाले.
ते हरीत क्रांतीचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे संस्थापक होते,त्यांच वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले रविवारी सकाळी वेणातीरी त्यांचेवर अंत्यसंस्कार करणेत आले त्यावेळी माजी सभापती बापूराव पार्टे अध्यक्ष राजेंद्र धनावडे मराठा पतसंस्थेचे माजी चेअरमन तुकाराम धनावडे जावली बॅक संचालक विश्वनाथ धनावडे सुनिल धनावडे आबा गुरुजी आदिनी त्यांना श्रद्धांजली वाहीली.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती मामर्डी श्री केदारेश्वर भजन मंडळ मामुर्डी राजकीय सामाजीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.



