महाराष्ट्रसातारासामाजिक

महाबळेश्वरहून – साताराकडे जाणारा डंम्परला अपघात

केळघर. दि.२५. महाबळेश्वरहून – साताराकडे जाणारा डंम्पर केळघर घाटात मुकवली माची गावच्या हद्दीत दरीत कोसळून चालक जखमी झाला असून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आला.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी कि, महाबळेश्वहून साताराकडे जाणारा टी अॅन्ड टी कंपनीचा डंम्पर क्रमांक एम एच १२ टी व्ही – ८२८९ हा एका वळणावर चालकास अंदाज न आल्यामुळे शंभर फूट दरीत कोसळला . यावेळी चालक मुकेश कुमार (बिहार) हा जखमी झाला . यावेळी प्रसंगावधान राखत मुकवली माची येथील सर्जेराव खुटेकर , रमेश खुटेकर, बबन खुटेकर यांनी चालकास बाहेर काढून महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या आठवड्यातील घाटातील हा दुसरा अपघात असून अजूनही बांधकाम विभाग घाटातील सुरक्षित प्रवाशासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही . येथील अनेक अवघड वळणांचा चालकांना अंदाज येत नाही . तर अनेक ठिकाणी मजबूत संरक्षण कठडे नाहीत . काही ठिकाणी केवळ भराव टाकून मलपटटी केली असल्याने चालकांना वळणांचा अंदाज येत नाही . तर या रस्त्याचे केलेले कामही अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे आहे . त्यामुळे वाहन चालक व प्रवाशी वर्गातून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!