महाराष्ट्रसातारासामाजिक

जिल्हा वार्षिक योजनेचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला आढावा

कामांच्या प्रस्तांवांची प्रशासकीय मान्यता लवकर घ्या

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —- प्रतिनिधी

सातारा-दि.19- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत दायित्व निधी मागणी व नवीन कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर मान्यता साठी सादर करावेत व प्रशासकीय मान्याता घेवून ऑगस्ट 2023 पर्यंत कामाची वर्क ऑर्डर तयार ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या गावांमध्ये अंगणवाडीला स्वत:ची इमारत नाही अशांची यादी तयार करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री.डूडी म्हणाले, ज्या ठिकाणी जागेची अडचण असल्यास त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात यावा. तसेच जिल्हा परिषदेंच्या शाळांपरिसर मध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध आहे का याची तपासणी करावी.

जिल्हा परिषद शाळांसाठी क्रीडांगण व व्यायाम शाळा निर्माण करावयाची आहेत. त्याचे प्रस्तावही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी यांचेकडे तात्काळ द्यावेत. प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जलदगतीने करावे. ज्या विभागांनी प्रशासकीय मान्यता घेतली नाही अशा विभाग प्रमुखांची पुन्हा 20 जुलै 2023 बैठक घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-2024 अंतर्गत मंजूर तरतूद, सन 2022-2023 आणि त्या पूर्वीचे दायित्व व 2023-24 अंतर्गत प्रशासकीय मंजुरी व निधी वितरणासाठी सादर केलेल्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.
00000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!