सातारासामाजिक

स्वातंत्र सैनिक व त्यांचे जोडीदार यांचा मानपत्र,स्मृतीचिन्ह देवून केला सन्मान

स्टार ११ महाराष्ट्र न्युज युवराज धुमाळ

मेढा. दि.१९.स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्वातंत्र सैनिकांनी देशाच्या स्वातंत्रासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आज महसुल उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे,उपविभाग जावली,तहसिलदार हणमंत कोळेकर मेढा यांचे मार्फत स्वातंत्र सैनिक व त्यांचे जोडीदार यांचा मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


स्वातंत्र सैनिक व त्यांचे जोडीदार यांचे वय विचारात घेता त्यांना कमीत कमी त्रास होईल याप्रमाणे नियोजन करून श्रीमती कुसुमताई लक्ष्मण फरांदे, यांचा स्वातंत्र सैनिक जोडीदार म्हणून मौजे आनेवाडी येथे त्यांचे घरी जाऊन मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला.

यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी श्रीमती हर्षदा फाळके अव्वल कारकून, श्री. पंकज शिंदे, अव्वल कारकून, संगणक तज्ञ, श्रीमती सुप्रिया फरांदे, मंडल अधिकारी, डी. एन. शिंदे, तलाठी श्री. अनिल कांबळे इ. उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!