सामाजिक

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘बाबाराजे’ युवा मंचाची सामाजिक बांधिलकी

स्टार ११ महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी समाज एकवटला; शिक्षण-क्रीडा साहित्याचे उत्साहात वाटप

मेढा.दि.२०.     विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबाराजे युवा मंच पुनवडी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुनवडी येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य तसेच शालेय वह्या-पुस्तकांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

शैक्षणिक साहित्याचा सामाजिक उपक्रम हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी असून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ‘बाबाराजे’ युवा मंचाची साथ कायम राहणार असल्याचे बापू पार्टे यांनी सांगितले.

यावेळी शाळेत कार्यरत असलेले जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित शिक्षक विशाल दळवी यांचाही बाबाराजे युवा मंच यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

भाजपचे युवा नेते सुनील नाना जांभळे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे संतोष पां.पार्टे सांगितले.

यावेळी हॉटेल समृद्धीचे मालक सचिन पार्टे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणाबरोबरच क्रीडा, शिस्त आणि सातत्य यांना महत्त्व देत भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमासाठी सरपंच सुरेश पार्टे,तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम पार्टे,माजी सरपंच प्रकाश पार्टे,शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र उंबरकर, बंडू पार्टे,पोलीस पाटील ज्योती पार्टे,महिला मंडळ अध्यक्ष लक्ष्मी उंबरकर, शिपाई आनंदा पार्टे,जनार्दन पार्टे,दत्तात्रय पार्टे,तुकाराम पार्टे,किसन पार्टे,बाळासो पार्टे,शांताराम पार्टे, तरुण वर्ग, महिला मंडळ उपस्थित होते.

बाबाराजे युवा मंच यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन वह्या-पुस्तके व क्रीडा साहित्याचे वाटप, तसेच गुणवंत शिक्षकांचा सन्मान अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम ठरला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!