
स्टार ११ महाराष्ट्र
केळघर.दि.१९. केळघर विभागासह ५४ गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी महत्वाचा असलेल्या बोंडारवाडी धरण प्रकल्प पोलिस बंदोबस्तात धरणाच्या ट्रायलपिटसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भुतेघर, वाहिटे व बोंडारवाडी येथील ग्रामस्थ,महिला यांनी ट्रायल पीट करण्यास विरोध केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार धरणरेषेजवळ ट्रायलपिट घेण्यात येणार असल्याने मेढ्याचे सपोनि सुधिर पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थांची बैठक घेऊन व चर्चा करून ट्रायलपिटला विरोध करू नये व अडथळा निर्माण करू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील अशा सुचना ग्रामस्थांना दिल्या होत्या . त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आम्हाला दोन दिवसाचा अवधी मिळावा आशा आशयाचे निवेदनही पोलिसांना दिले होते. स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते.यामुळे ट्रायल पीट करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ट्रायल पीट करता आली नाही.
बोंडारवाडी धरणास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रत्यक्ष धरण रेषेवर विंधन विवरे (ट्रायल पीट)घेणे आवश्यक आहे.अंदाजे ५५००हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार असून भूस्तर निश्चिती झाल्याशिवाय नियोजित धरणाचे अंदाजपत्रक करणे अशक्य आहे.
– अमर काशीद
कार्यकारी अभियंता,उरमोडी धरण विभाग.
दरम्यान याबाबत माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले बदललेल्या धरण रेषेवर धरण झाले तर स्थानिक नागरिकांना नुकसान सहन करावे लागणार असल्याने भुतेघर,वाहिटे व बोंडारवाडी येथील गावे बाधित होणार असून त्यामुळे या धरण रेषेस ग्रामस्थांचा विरोध आहे.धरणाच्या ट्रायल पीट ही बळजबरीने केली जात आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक गणेशोत्सवानंतर लावण्यात यावी याबाबतचे निवेदनही तहसीलदार हणमंत कोळेकर यांना देण्यात आले.
स्थानिक ग्रामस्थांची दिशाभुल करून ट्रायल पिट केली जात आहे.५४ गावातील ग्रामस्थांना पाण्याची गरज आहे का ? याचेही सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. बदललेल्या धरण रेषेवर धरण झाले तर तिन्ही गावे पूर्णतः बाधीत होणार असून धरण रेषेला ग्रामस्थांचा विरोध आहे.
अंकुश मानकुंबरे.
सरपंच ग्रामपंचायत भुतेघर.
यावेळी उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता अमर काशीद सपोनी सुधिर पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थिती होती.



