
स्टार ११ महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री मा. ना.अजित दादा पवार यांना भेटून करणार मागणी
मेढा.दि.१९. सातारा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आयु. संजय भैय्या सोनवणे यांच्या आदेशाने तसेच सातारा जिल्हाध्यक्ष आयु किरण दादा बगाडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न झाली यावेळी किरण बगाडे म्हणाले की संजय भैय्या सोनवणे हे निस्वार्थी नेतृत्व आहे संजय भैय्या सोनवणे यांच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे काम जोरदार सुरू आहे आजच सातारा जिल्हा यांच्यावतीने बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये संघटन वाढवणार असून घराघरांमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पोहोचवणार अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी दिली.

तसेच लवकरच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा मुंबई या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळावा होणार असून या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार असून यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
पक्ष मजबूत करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
संघटन हा पक्षाचा कणा असून संघटन प्रत्येक तालुक्यामध्ये बांधणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे यासाठी सर्वतोपारी ताकद आणि सहकार्य कार्यकर्त्याला करणार या बैठकीमध्ये सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष भिसे तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी आतिश कांबळे जावली तालुका अध्यक्षपदी सुहास चव्हाण जावली तालुका सरचिटणीस मंगेश पवार जावली तालुका विद्यार्थी आघाडी अविराज परीहार विद्यार्थ्याकडे उपाध्यक्ष आर्यन कांबळे सातारा युवक अध्यक्ष तुषार कांबळे जावली युवक उपाध्यक्ष साहिल गाडे चावली तालुका संघटक भीम पवार जावली वाहतूक आघाडी अध्यक्ष आर्यन गाडे जावली युवक सचिव वैभव सोनवणे यांच्या निवडी किरण बगाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर बैठकीसाठी सातारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सविताताई सपकाळ जिल्हा उपाध्यक्ष संतोष भिसे सुहास चव्हाण महाबळेश्वर तालुका अध्यक्ष सुनील कदम वायु विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे तालुका उपाध्यक्ष सयाजी भिसे राजीव भिसे प्रतीक मोरे वाई युवक अध्यक्ष आकाश गायकवाड युवक अध्यक्ष सुनिल गायकवाड व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




