स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——-
मेढा,दि .११. जावलीतील सर्व शेतकर्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा त्यातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय घोरपडे यांनी केले .सावली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग जावळी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली यांचे वतीने कृषी संजीवनी सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय घोरपडे बोलत होते.
यावेळी सावलीचे सरपंच विजय सपकाळ, प्रगतशील शेतकरी नामदेव धनावडे, अजिंक्य नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, पोलिस पाटील संजय कांबळे, कृषी सहायक विलास कदम, भानुदास चोरगे, कृषी पर्यवेक्षक अजय पवार , ग्रामपंचायत सदस्य आनंदा जुनघरे, सुरेश कांबळे, निर्मला जुनघरे, प्रकाश जुनघरे, विजय जुनघरे , बाबुराव जुनघरे,, धोडीबा जुनघरे आदी उपस्थित होते .
कृषी संजीवनी सप्ताहाचे विशेष महत्त्व श्री घोरपडे यांनी सांगून सावली गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच तृणधान्य वर्षा च्या निमित्ताने आहारामध्ये राळा वरी बाजरी नाचणी ज्वारी इत्यादी तृणधान्यांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले.सरपंच विजय सपकाळ यांनी सावली गावामध्ये कृषी विभागामार्फत आणखी काही योजना कशा पद्धतीने आणता येतील. तसेच गावाच्या कडेने असणाऱ्या वनविभागाच्या क्षेत्राविषयी तसेच जंगली जनावरांपासून शेतीस होणाऱ्या त्रासाबद्दल अडचणी मांडल्या व त्यातून काही मार्ग काढता येईल का शेतीला आमच्या संरक्षण तार कंपाऊंड देता येईल का ? याबाबत चर्चा केली. कृषी सहाय्यक भानुदास चोरगे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना . कृषी विषयक थोडक्यात माहिती दिली .
कृषी पर्यवेक्षक अजय पवार यांनीही कृषी विभागाच्या विविध योजनांची थोडक्यात माहिती दिली. कृषी सहायक भानुदास चोरगे यांनीही यविळी मार्गदर्शन केले प्रगतशील शेतकरी नामदेव धनवडे यांनी बांबू लागवडी विषयक माहिती दिली . कृषी सहाय्यक विलास कदम यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाला बहुसंख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या.